वडगावची मुख्य जलवाहनी फुटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2019 11:10 PM2019-09-05T23:10:27+5:302019-09-05T23:10:34+5:30
जेसीबीने खोदकाम करताना घडला प्रकार
वाळूज महानगर : भूमिगत केबल वायर टाकण्यासाठी जेसीबीने खोदकाम करीत असताना गुरुवारी पंढरपूर महावीर चौकात वडगावची मुख्य जलवाहिनी फुटली. जेसीबी चालकाच्या या निष्काळजीपणामुळे जलवाहिनी फुटून शेकडो लीटर पाणी रस्त्यावरुन वाहून गेले.
दरम्यान, ग्रामपंचायतीने पाणीपुरवठा बंद करुन जलवाहिनी दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे शुक्रवारी काही भागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
वडगाव ग्रामपंचायतीने गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी बजाज गेट येथील एमआयडीसीच्या जलकुंभापासून पंढरपूर महावीर चौकमार्गे वडगाव जलकुंभापर्यंत लोखंडी जलवाहिनी टाकली आहे. येथील महावीर चौकात एमआयडीसीकडून भूमिगत केबल अंथरण्याचे काम सुरु आहे.
यासाठी जेसीबीच्या सहाय्याने खोदकाम करताना गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजता जलवाहिनी फुटली. घटनेची माहिती मिळताच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर या कर्मचाऱ्यांनी जलवाहिनीचा पाणीपुरवठा बंद करुन दुरुस्तीचे काम हाती घेतले. मात्र, अंधार पडल्याने दुरुस्तीचे काम शुक्रवारी केले जाणार आहे. दरम्यान, जलवाहिनी फुटून जवळपास तासभर पाणी रस्त्यावरुन वाहत असल्याने शेकडो लीटर पाणी वाहून गेले.
दरम्यान, जलकुंभात पाणीसाठा नसल्याने शुक्रवारी छत्रपतीनगर व मूळ गावचा होणारा पाणीपुरवठा बंद रहील, असे सरपंच उषा साळे यांनी सांगितले.