वाडी पाणीपुरवठा योजना जूनअखेर होणार कार्यान्वित

By Admin | Published: March 20, 2016 12:52 AM2016-03-20T00:52:51+5:302016-03-20T01:01:14+5:30

श्रीनिवास भोसले, नांदेड नांदेड शहरालगत असणाऱ्या वाडी (बु) ला पाणीपुरवठा करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून १७ कोटी १७ लाख रूपयांची योजना राबविण्यात येत आहे़

Wadi Water Supply Scheme will be implemented by June | वाडी पाणीपुरवठा योजना जूनअखेर होणार कार्यान्वित

वाडी पाणीपुरवठा योजना जूनअखेर होणार कार्यान्वित

googlenewsNext

श्रीनिवास भोसले, नांदेड
नांदेड शहरालगत असणाऱ्या वाडी (बु) ला पाणीपुरवठा करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून १७ कोटी १७ लाख रूपयांची योजना राबविण्यात येत आहे़ या योजनेचे काम अंतिम टप्प्यात असून सदरील योजना जूनअखेर कार्यान्वित होईल, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली़
वाडी बु़ आणि परिसरातील पाणीपातळी खालवल्याने नागरिकांना पाणीटंचाईच्या झळा बसत आहेत़ या भागातील पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी शासनाने मंजूर केलेल्या १७ कोटी रूपयांच्या योजनेचे काम अंतिम टप्प्यात आहे़
सदरील योजनेतील पंपगृहाचे काम पूर्ण झाले असून उद्धरणनलिकेच्या पाईपलाईन अंथरण्याचे काम प्रगतीपथावर आहे़ एकूण ४०५० मीटरपैकी जवळपास ३२०० मीटर लांबीचे काम पूर्ण झाले आहे़ महापालिका हद्दीत येणाऱ्या ४०० मीटर पाईप अंथरण्याचे काम शिल्लक आहे़ शुद्ध जल बँ्रच उद्धरण -नलिका आणि शुद्ध जल गुरूत्ववाहिनीचे काम ८० टक्के काम पूर्ण झाले आहे़
नवी वाडी येथील शाळेच्या पाठीमागे उभारण्यात येत असलेल्या मुख्य संतुलन टाकीसह जागृत हनुमाननगर आणि लोकमित्रनगर येथील सलोह जलकुंभाचे आरसीसी काम पूर्ण झाले आहे़ तर वाडी मूळ गावातील जलकुंभाचे काम सुरू आहे़ तसेच या योजनेअंतर्गत वितरण व्यवस्थेकरिता एकूण ५४ कि़मीची पाईपलाईन मंजूर असून यातील ४७ किलोमीटर पाईपलाईन अंथरण्याचे काम पूर्ण झाले आहे़ या योजनेतील पाईपलाईन टाकण्यासाठी खोदलेले रस्ते लगेच दुरूस्त करून डांबरीकरण करावे, अशी मागणी होत आहे़ दरम्यान, या योजनेत वाढीव पाईप लाईनकरीता निधीकरीता मजिप्रातर्फे सर्वेक्षण करून वाढीव निधीचा प्रस्ताव तयार केला आहे़
योजनाच पर्याय : वाडीसह परिसरातील नगरांना पाणीपुरवठा योजनेशिवाय पर्याय नाही़ या भागातील पाणीपातळी ७०० ते १२०० फूट खोल गेली आहे़ सध्या सुरू असलेल्या पाणीपुरवठ्याच्या योजनेच्या कामांना गती देवून या भागातील नागरिकांना जूनअखेरपर्यंत पाणी देण्याचा प्राधिकरणच्या अधिकारी आणि संबंधित कंत्राटदाराचा प्रयत्न आहे़

Web Title: Wadi Water Supply Scheme will be implemented by June

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.