घशात वेफर्सचा तुकडा अडकला
By Admin | Published: October 22, 2014 12:42 AM2014-10-22T00:42:06+5:302014-10-22T01:21:29+5:30
औरंगाबाद : रेल्वे प्रवासात एक वर्षाच्या मुलाच्या घशात वेफर्सचा तुकडा अडकल्याची घटना घडली.
औरंगाबाद : रेल्वे प्रवासात एक वर्षाच्या मुलाच्या घशात वेफर्सचा तुकडा अडकल्याची घटना २० आॅक्टोबर रोजी घडली. यावेळी सदर मुलाच्या तोंडातून रक्तस्त्राव सुरू झाला. यामुळे त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. दरम्यान, औरंगाबाद रेल्वेस्थानकाहून त्याला वेळीच उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
नंदिग्राम एक्स्प्रेसने अदिलाबाद येथून ठाण्याला जाणाऱ्या कुटुंबियांनी प्रवासादरम्यान वेफर्स विकत घेतले होते. यावेळी त्यांनी आपल्या एक वर्षाच्या मुलालाही वेफर्स खायला दिले.
काही वेळानंतर चिमुकला रडू लागला. तेव्हा वेफर्स घशात अडकल्याचे दिसून आले. औरंगाबाद रेल्वेस्थानकावर ही गाडी आल्यावर या मुलास रुग्णवाहिकेने उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. ही माहिती रेल्वे प्रवासी सेनेचे अध्यक्ष संतोषकुमार सोमाणी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.