उद्योगनगरीतील श्रेया लाइफ कंपनी कामगारांचे वेतन थकले : संतप्त कामगारांचे ठिय्या आंदोलन; दोन दिवसांत वेतन देण्याचे आश्वासन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:02 AM2021-08-13T04:02:07+5:302021-08-13T04:02:07+5:30
वाळूज महानगर : वाळूज उद्योगनगरीतील श्रेया लाइफ सायन्सेस कंपनीच्या कामगारांचे गेल्या तीन ते चार महिन्यांपासून वेतन थकले आहे. ...
वाळूज महानगर : वाळूज उद्योगनगरीतील श्रेया लाइफ सायन्सेस कंपनीच्या कामगारांचे गेल्या तीन ते चार महिन्यांपासून वेतन थकले आहे. संतप्त कामगारांनी थकीत वेतनासाठी गुरुवारी (दि.१२) कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या आंदोलन करून घोषणाबाजी केली.
श्रेया लाइफ सायन्सेस प्रा.लि. कंपनीत औषधीचे उत्पादन करण्यात येते. या कंपनीत जवळपास ३०० ते ४०० कंत्राटी महिला व पुरुष कामगार काम करतात. गत तीन ते चार महिन्यांपासून वेतन मिळाले नसल्यामुळे गुरुवारी सकाळपासून कामगारांनी कंपनीच्या गेटसमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. यावेळी कामगारांनी घोषणाबाजी करून थकीत वेतन अदा करण्याची मागणी केली.
दोन दिवसांत वेतन देण्याचे आश्वासन
ठिय्या आंदोलनामुळे कंपनी व्यवस्थापनाचे प्रतिनिधी प्रशांत सोनी यांनी प्रवेशद्वारासमोर येऊन कामगारांशी चर्चा केली. कामगारांनी सोनी यांना धारेवर धरले. यानंतर सोनी यांनी वेतन देण्यास विलंब झाल्याची कबुली देत दोन दिवसांत थकीत वेतन देण्याचे आश्वासन कामगारांना दिले. या आश्वासनानंतर कामगारांनी आंदोलन मागे घेत कंपनीत कामावर रुजू झाले.
फोटो ओळ-
थकीत वेतनासाठी वाळूज एमआयडीसीतील श्रेया लाइफ सायन्सेस प्रा.लि. कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर आंदोलन करणाऱ्या कामगारांशी चर्चा करताना व्यवस्थापनाचे प्रतिनिधी प्रशांत सोनी.
--------------------------