सातारा रस्त्यावर ड्रेनेजच्या पाण्यातून काढावे लागते वाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:05 AM2021-06-03T04:05:17+5:302021-06-03T04:05:17+5:30
औरंगाबाद : ड्रेनेजच्या पाण्याचा रस्त्यावर पाट वाहतो असून, त्यातून नागरिकांना काढावी लागते वाट. अधिकारी कर्मचारीदेखील याच रस्त्यावरून वाहणाऱ्या घाण ...
औरंगाबाद : ड्रेनेजच्या पाण्याचा रस्त्यावर पाट वाहतो असून, त्यातून नागरिकांना काढावी लागते वाट. अधिकारी कर्मचारीदेखील याच रस्त्यावरून वाहणाऱ्या घाण पाण्यातून डोळेझाक करीत निघून जातात.
सातारा परिसरात गट नं ८२ जवळील रामदेव बाबा मंदिरासमोरील मुख्य रस्त्यावर नेहमी अशा प्रकारे ड्रेनेजचे पाणी ओव्हर फ्लो होऊन रस्त्यावर वाहते. मुळात या रस्त्याचे सिमेंट काम अर्धवट सोडून दिले आहे. त्यामुळे नागरिकांना त्रासात भरच पडली आहे. हे अहिल्याबाई होळकर चौकापर्यंत करणे आवश्यक होते. या अपूर्ण कामाचा त्रास भारत बटालियन, खंडोबा मंदिर, तसेच सातारा गावात जाणाऱ्या नागरिकांना होतो. सातारा परिसर महापालिका हद्दीत असूनही अशी दुर्दशा आहे. त्यामुळे ड्रेनेजच्या चोकअपचा प्रश्न निकाली काढावा, अशी मागणी होत आहे.
अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष...
वाहत्या गटारगंगेने आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. महानगरपालिकेचे अधिकारी जाताना डोळे झाकून जातात काय? असा प्रश्न आमच्यासारख्या साध्या माणसांना नेहमी पडतो.-संगीता सुरडकर( फोटो)
आजार वाढण्याची भिती...
रस्ता गुळगुळीत केला, त्यावर ड्रेनेजच्या घाण पाण्याचे पाट वाहत आहे. मनपाचे कर्मचारी थातूरमातूर दुरुस्ती करून जातात. दर पंधरा दिवसाला ड्रेनेजचे पाणी रस्त्यावरून वाहत आहे. याला जबाबदार कोण ?
रावसाहेब ससाने (फोटो)
कॅप्शन:-सातारा रस्त्यावर वाहत असलेले ड्रेनजचे पाट