लिहाखेडी-सारोळा रस्त्याची लागली वाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:06 AM2021-09-18T04:06:14+5:302021-09-18T04:06:14+5:30
औरंगाबाद-जळगाव महामार्गाचे काम चालू असल्याने या रस्त्यावरून ठेकेदार कंपनीची जड वाहतूक सुरू आहे. यामुळे हा रस्ता संपूर्ण उखडला आहे. ...
औरंगाबाद-जळगाव महामार्गाचे काम चालू असल्याने या रस्त्यावरून ठेकेदार कंपनीची जड वाहतूक सुरू आहे. यामुळे हा रस्ता संपूर्ण उखडला आहे. लिहाखेडी-सारोळा-उंडणगावपर्यंत १४ किलोमीटर रस्त्याचे काम २००९ च्या दरम्यान प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत करण्यात आले होते. मात्र, आता हा संपूर्ण रस्ता खड्ड्यांमध्ये गेला आहे. सारोळा येथे ग्रामदैवत असलेले गयबंशावली दर्गा व गहिनीनाथ मंदिर असल्याने येथे मराठवाडा, खान्देश, विदर्भातून भाविकांची सतत गर्दी असते. मात्र, या रस्त्यामुळे त्यांना खूप त्रास सहन करावा लागत आहे.
चौकट...
रस्त्यामुळे बसफेऱ्या कमी
लिहाखेडी-सारोळा या रस्त्याची चाळण झाल्याने बसच्या पाच फेऱ्यांऐवजी फक्त दोन फेऱ्या चालू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थी, नागरिकांसह भाविकांना देखील याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. जड वाहतुकीमुळे या रस्त्यावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडले आहेत. याप्रकरणी औरंगाबा- जळगाव महामार्गाच्या ठेकेदाराशी संपर्क साधला असता, ते म्हणाले की, लिहाखेडी-सारोळा हा रस्ता दुरुस्त करायचा आहे. मात्र, पावसामुळे शक्य झाले नाही. पाऊस थांबला की रस्ता करून देऊ.
170921\screenshot_20210912-104057_video player.jpg
नेहा किडी सारोळा रस्त्याची लागली वाट कॉन्ट्रॅक्टदार यांचे दुर्लक्ष