अंधारातच प्रवाशांची बससाठी प्रतीक्षा

By Admin | Published: May 19, 2017 12:18 AM2017-05-19T00:18:12+5:302017-05-19T00:19:00+5:30

उस्मानाबाद : राज्य परिवहन महामंडळाच्या उस्मानाबाद आगारातील समस्यांचे ग्रहण कायम असल्याचे चित्र बुधवारी रात्री दिसून आले.

Waiting for the bus passengers in the dark | अंधारातच प्रवाशांची बससाठी प्रतीक्षा

अंधारातच प्रवाशांची बससाठी प्रतीक्षा

googlenewsNext

विजय मुंडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
उस्मानाबाद : राज्य परिवहन महामंडळाच्या उस्मानाबाद आगारातील समस्यांचे ग्रहण कायम असल्याचे चित्र बुधवारी रात्री दिसून आले. बसस्थानक परिसरातील अंधारात अनेकप्रवासी चिमुकल्या लेकरा-बाळांसह बसची वाट पहात होते. त्यातच अवेळी सुटणाऱ्या बसेस, अस्वच्छता या समस्यांचाही त्यांना सामना करावा लागत होता. विशेष म्हणजे, नो पार्किंग झोन दिवसाच नाही तर रात्रीही केवळ नावाला उरला असून, दुचाकींसह रिक्षे, चारचाकी वाहने थेट फलाटावरच असल्याचे चित्र होते.
उस्मानाबाद येथील बसस्थानकात जिल्ह्यातील नागरिकांची दैनंदिन ये-जा असते़ शासकीय, निमशासकीय, व्यवसायिक, नोकरी-व्यवसायाला येणाऱ्यांसह विद्यार्थीही बसमधून नियमित ये-जा करतात़ बसचा प्रवास तुलनेने सुरक्षित मानला जात असल्याने आजही अनेकजण एसटी प्रवासाला प्राधान्य देता. मात्र, बसस्थानकातील असुविधा, नियोजनशुन्य कामकाजामुळे प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याचे बुधवारी रात्री ७ ते १० दरम्यान केलेल्या पाहणीत दिसून आले़ बसस्थानकातील ‘इन’ गेट परिसरातील खांबावरील पथदिवा सुरू असल्याने या भागात काहीसा उजेड आहे. हॉटेलमधील पथदिव्यांचाही बसस्थानक परिसराला आधार मिळत आहे़ हा भाग व मुख्य बसस्थानकातील भाग वगळता परिसरात सर्वत्र अंधाराचे साम्राज्य होते़ वाहने पार्किंग करण्यासाठी असलेल्या परिसरात अंधार होता़ तर बसस्थानकातील नो पार्किंगच्या जागेत दुचाकींसह चारचाकी वाहने डौलात उभी होती. विशेष म्हणजे काही रिक्षा चालकांनी बस थांबणाऱ्या फलाटावरच रिक्षा नेला होता़ आतील प्रवाशांचे सामान उतरेपर्यंत रिक्षा फलाटावरच उभा होेता़ मात्र, त्या रिक्षा चालकाला याचा जाब ना अधिकाऱ्यांनी विचारला ना सुरक्षा रक्षकांनी!
बसस्थानकातून वेळेवर बसेस सुटल्या तर नवलच! अशा प्रतिक्रीया प्रवासी देत आहेत़ त्याचाही प्रत्यय यावेळी आला़ वैरागकडे जाणारी ७़३० वाजता जाणारी बस रात्री ८़१५ वाजण्याच्या सुमारास मार्गस्थ झाली़ ७़१५ ची मुरूड बस ८़१६ वाजता बसस्थानकातून बाहेर पडली़ रात्री ८ वाजता जाणारी सुर्डी बस तब्बल एक तास उशिराने म्हणजे ९ वाजता गेली़ ८़३० ची तुळजापूर नाशिक ही बस ९़५५ वाजता फलाटावर लागली होती़ ९ ची बोरिवली आणि कळंब या दोन बसेस वेळेवर मार्गस्थ झाल्या़ सुर्डीकडे जाणारी बस आठवड्यातून तीन-चार वेळेस उशिरानेच धावते़ विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वी याच मार्गावरील विद्यार्थी, प्रवाशांनी बस न लागल्याने स्थानकातून सुटणाऱ्या बसेस अडविल्या होत्या़
त्यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांना यापुढील काळात वेळेवर बस सोडण्यात येतील असे आश्वासन दिल्याने हे आंदोलन मागे त्यावेळी मागे घेण्यात आले घेतले विशेष म्हणजे त्यावेळी पोलीस अधिकाऱ्यांना घटनास्थळी धाव घेऊन मध्यस्थी करावी लागली होती़ मात्र आंदोलन झालेले असतानाही या मार्गावरील बस आजही वेळेवर सोडल्या जात नसल्याचा प्रत्यय बुधवारी रात्री आला.

Web Title: Waiting for the bus passengers in the dark

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.