रक्तपेढ्यांना प्रतीक्षा दात्यांची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2017 12:18 AM2017-11-01T00:18:57+5:302017-11-01T00:19:02+5:30

नुकत्याच झालेल्या महापालिकेच्या निवडणुका त्यानंतर आलेली दिवाळी यामुळे रक्तदान शिबिरे ठप्प झाली असून त्याचा मोठा फटका रक्ताची गरज असलेल्या रुग्णांना बसत आहे़ शहरातील पाच आणि शासकीय रुग्णालयातील एक अशा सर्वच रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा जाणवत आहे़ त्यामुळे रक्तदात्यांनी पुढे येण्याची गरज आहे़

Waiting donors for blood banks | रक्तपेढ्यांना प्रतीक्षा दात्यांची

रक्तपेढ्यांना प्रतीक्षा दात्यांची

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड: नुकत्याच झालेल्या महापालिकेच्या निवडणुका त्यानंतर आलेली दिवाळी यामुळे रक्तदान शिबिरे ठप्प झाली असून त्याचा मोठा फटका रक्ताची गरज असलेल्या रुग्णांना बसत आहे़ शहरातील पाच आणि शासकीय रुग्णालयातील एक अशा सर्वच रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा जाणवत आहे़ त्यामुळे रक्तदात्यांनी पुढे येण्याची गरज आहे़
नांदेड जिल्ह्यात उन्हाळ्यात पाणीटंचाई, त्यानंतर चलनटंचाईने नागरिक त्रस्त होते़ आता मात्र रक्ताची टंचाई जाणवत असल्याने रुग्णांचा जीव टांगणीला लागला आहे़ गेले दीड महिना शहरात महापालिका निवडणुकीची धामधूम सुरु होती़ आचारसंहिता सुरु असल्यामुळे राजकीय पक्षांनीही रक्तदान शिबिरासारखे कार्यक्रम आयोजित केले नाहीत़ त्यात इतरही सामाजिक संघटनांनी जयंती, पुण्यतिथीनिमित्त रक्तदान शिबिरे आयोजित केली नाहीत़ निवडणूक संपताच दिवाळीचा सण आला़ या काळात शाळा-महाविद्यालयांनी सुट्या असतात़ दरवर्षी दिवाळीच्या काळात रक्ताचा तुटवडा जाणवतो़ परंतु यंदा त्यापूर्वी निवडणुका आल्याने रक्तदान शिबिरांची संख्या मोठ्या प्रमाणात रोडावली़ शासकीय रुग्णालयात सुसज्ज रक्तपेढी आहे़ या ठिकाणी दररोज नांदेडसह, हिंगोली, परभणी, यवतमाळ शेजारील आंध्र प्रदेशातून मोठ्या प्रमाणात रुग्ण दाखल होतात़ त्यामुळे अपघातातील जखमी, प्रसूतीसाठी आलेल्या गरोदर मातांचाही मोठा समावेश असतो़ शस्त्रक्रियेनंतर यातील अनेक रुग्णांना रक्ताची गरज भासते़
परंतु शासकीय रक्तपेढीतही रक्ताची कमतरता आहे़ रुग्णांच्या नातेवाईकालाच दात्याची व्यवस्था करावी लागत आहे़ रक्तासाठी ऐनवेळी धावपळ करण्याची वेळ येत असल्याने रुग्णांचे नातेवाईक मेटाकुटीला आले आहेत़ नातेवाईक किंवा त्याच रक्तगटाच्या व्यक्तीला शोधून आणण्यात वेळ आणि पैसा खर्च होत आहे़ शासकीय रुग्णालयात दररोज ३० पेक्षा अधिक रक्ताच्या पिशव्यांची गरज आहे़ त्यामुळे रुग्णालयाला सातत्याने रक्तदात्यांची प्रतीक्षा असते़ त्याचबरोबर दुसरीकडे शहरात खाजगी रुग्णालयांची संख्याही लक्षणीय आहे़ या रुग्णालयांमध्ये दररोज होणाºया शस्त्रक्रिया व इतर आजारासाठी रुग्णांना रक्त लागते़ परंतु सर्वच रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा जाणवत आहे़

Web Title: Waiting donors for blood banks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.