लाडसावंगी परिसराला मोठ्या पावसाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:04 AM2021-07-26T04:04:22+5:302021-07-26T04:04:22+5:30

परिसरात पावसाला सुरुवात होऊन दीड महिना उलटला; परंतु अद्याप मोठ्या पावसाने हजेरी लावलेली नाही. मध्येच दडी दिल्याने काही शेतकऱ्यांना ...

Waiting for heavy rains in Ladsawangi area | लाडसावंगी परिसराला मोठ्या पावसाची प्रतीक्षा

लाडसावंगी परिसराला मोठ्या पावसाची प्रतीक्षा

googlenewsNext

परिसरात पावसाला सुरुवात होऊन दीड महिना उलटला; परंतु अद्याप मोठ्या पावसाने हजेरी लावलेली नाही. मध्येच दडी दिल्याने काही शेतकऱ्यांना दुबार, तर काहींना तिबार पेरणी करावी लागली. जून महिन्यात ७० मि.मी., तर जुलै महिन्यात ८० मि.मी. पाऊस पडला. कधी रिमझिम तर कधी भिज, तर कधी वापसा मोड पाऊस झाल्याने शेतात केवळ तण माजले आहे. यात मागील रविवारपासून पाऊस उघडला असून दररोज सोसाट्याचा वारा सुटत असल्याने पिकांची मुळे खिळखिळी बनली आहेत. लाडसावंगीसह पाच गावांना पाणीपुरवठा करणारे बाबूवाडी धरण कोरडे पडण्याच्या मार्गावर आहे. याच धरणात मागील वर्षी पन्नास टक्के पाणीसाठा जमा होऊन पिके गुडघ्याच्या वर वाढ झाली होती. यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा लागून राहिली आहे.

250721\img_20210725_074838.jpg

लाडसावंगी परिसरात सुसाट वाऱ्यामुळे पिके खिळखिळी होऊन कपाशीचे झाडे असे वाळत चालले आहे.

Web Title: Waiting for heavy rains in Ladsawangi area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.