कनिष्ठ निवासी डॉक्टरांना विद्यावेतनाची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 09:49 PM2019-05-24T21:49:40+5:302019-05-24T21:49:59+5:30
औरंगाबाद : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) अनेक कनिष्ठ निवासी डॉक्टरांना विद्यावेतनाची प्रतीक्षाच करावी लागत आहे. या परिस्थितीमुळे ...
औरंगाबाद : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) अनेक कनिष्ठ निवासी डॉक्टरांना विद्यावेतनाची प्रतीक्षाच करावी लागत आहे. या परिस्थितीमुळे घाटीत रुग्णसेवा देणाऱ्या डॉक्टरांनाच आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.
कनिष्ठ निवासी डॉक्टरांनी यासंदर्भात वैद्यकीय अधीक्षक डॉ. कैलास झिने यांची भेट घेतली. त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना विद्यावेतनाचे बिल सादर करण्याची सूचना केली; परंतु तीन दिवस उलटूनही डॉक्टरांना विद्यावेतन मिळालेले नाही. आगामी दोन दिवसांत विद्यावेतन दिले जाईल, असे डॉ. कैलास झिने यांनी सांगितले.