निकाल ऑनलाइन भरण्यासाठी बोर्डाकडून लिंक मिळण्याची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:05 AM2021-07-15T04:05:16+5:302021-07-15T04:05:16+5:30
-- औरंगाबाद ःकोरोनामुळे राज्य मंडळाच्या बारावीच्या परीक्षा रद्द झाल्यावर शिक्षण मंडळाने निकालासाठी मूल्यमापनाचे वेळापत्रक जाहीर केले. ७ ते २३ ...
--
औरंगाबाद ःकोरोनामुळे राज्य मंडळाच्या बारावीच्या परीक्षा रद्द झाल्यावर शिक्षण मंडळाने निकालासाठी मूल्यमापनाचे वेळापत्रक जाहीर केले. ७ ते २३ जुलैदरम्यान अंतर्गत मूल्यमापनाची प्रक्रिया पूर्ण करायची आहे. त्यात १४ ते २१ दरम्यान निकाल समितीने प्रमाणित केलेले गुण राज्य मंडळाच्या संगणकीय प्रणालीत भरायचे आहे; मात्र बुधवारी रात्री उशिरापर्यंत बोर्डाकडून लिंक मिळाली नसल्याचे कनिष्ठ महाविद्यालयाकडून सांगण्यात आले.
बारावीच्या निकालाची लिंकच बुधवारी सायंकाळपर्यंत मिळाली नाही. विभागीय शिक्षण मंडळांतर्गत येणाऱ्या पाच जिल्ह्यात १ लाख ५३ हजार ६१७ विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षेसाठी अर्ज भरला. त्यात १३१३ शाळांतून हे निकाल भरले जाणार आहेत. यात कला शाखेचे ५७ हजार ५६५, विज्ञान शाखेचे ८९ हजार ७८९, वाणिज्य शाखेचे १३ हजार ७८९, एमसीव्हीसी शाखेचे ४ हजार ८९२ परीक्षार्थी आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात ४५४ शाळांतून निकाल भरण्याची प्रक्रिया बुधवारी सुरू होणे अपेक्षित होते. देवगिरी महाविद्यालयाचे उपप्राचार्य रजनिकांत गरुड म्हणाले की, अद्याप लिंक मिळाली नाही. बोर्डातील अधिकाऱ्यांना याबद्दल विचारणा केली होती; मात्र त्यांना राज्य मंडळाकडून लिंक मिळाली नसल्याचे त्यांनी सांगितले असून, लिंकची प्रतीक्षा करत आहोत.
---
दहावीच्या त्रुटी दुरुस्ती सुरूच
---
दहावीच्या निकालातील ऑफलाइन त्रुटी, दुरुस्तीची कामे अद्याप संपलेली नाहीत. दुरुस्तीचे काम अद्याप सुरू असल्याचे बोर्डाच्या विभागीय सचिव सुगता पुन्ने यांनी सांगितले. तर रिपीटर विद्यार्थ्यांचे गुणपत्रकाच्या त्रुटी सर्वाधिक असून, जितक्या वेळेस परीक्षा दिली. ते गुणपत्र शाळांनी बोर्डात जमा करायला हवे होते. तसे न झाल्याच्या त्रुटी आहेत. निकालातील दुरुस्त्या ऑफलाइन दूर करून राज्य मंडळाकडे दिल्या जात असल्याचे बोर्डाकडून सांगण्यात आले.