खाटा रिकाम्या होण्याची रुग्णांची प्रतीक्षा; कोविड केअर सेंटर परिसरात कोरोनाबाधितांची रांग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 05:45 PM2021-03-20T17:45:00+5:302021-03-20T17:48:33+5:30

rapid growth of corona patients in Aurangabad वाढत्या कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येसमोर बेडही अपुरे पडत आहेत. परिणामी कोविड सेंटरवर रुग्णांच्या रांगा लागत आहेत.

Waiting for the patient to empty the bed; Queue of coroners at the Covid Care Center area | खाटा रिकाम्या होण्याची रुग्णांची प्रतीक्षा; कोविड केअर सेंटर परिसरात कोरोनाबाधितांची रांग

खाटा रिकाम्या होण्याची रुग्णांची प्रतीक्षा; कोविड केअर सेंटर परिसरात कोरोनाबाधितांची रांग

googlenewsNext
ठळक मुद्देरुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याचा परिणामदाखल रुग्ण बाहेर पडला की रिकाम्या खाटेवर वर्णी लागावी यासाठी प्रयत्न

औरंगाबाद : कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने सक्रिय रुग्णसंख्या आठ हजारांपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे उपलब्ध आरोग्य व्यवस्था अपुरी पडत असल्याने आता रुग्णांना खाटा रिकाम्या होईपर्यंत प्रतीक्षा करण्याची वेळ रुग्णांवर आली आहे. मनपाचे कोविड सेंटर, घाटीसह जिल्हा रुग्णालय परिसरात शुक्रवारी रुग्ण खाटा मिळण्याच्या प्रतीक्षेत ताटकळत बसले होते, तर लक्षणे नसलेले रुग्णही भीतीपोटी भरती करण्याचा आग्रह करतानाचे चित्र पाहायला मिळाले.

वाढत्या कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येसमोर बेडही अपुरे पडत आहेत. परिणामी कोविड सेंटरवर रुग्णांच्या रांगा लागत आहेत. दाखल रुग्ण बाहेर पडला की रिकाम्या खाटेवर वर्णी लागावी, यासाठी रुग्ण कोविड केअर सेंटरमध्ये रांगा लावत आहेत. तपासणीनंतर रिपोर्ट आल्यावर उपलब्ध बेड असलेल्या कोविड केअर सेंटरवर संदर्भित करण्यात येते. मात्र, तिथे उशीर लागला किंवा सोयीच्या केंद्रावर जागा मिळावी, यासाठी बाधित रुग्ण कोविड केअर सेंटर, जिल्हा रुग्णालय, घाटी परिसरात ठाण मांडून असल्याची सद्यस्थिती आहे. घाटी रुग्णालयात अपघात विभागात भरती करून नंतर मेडिसिन किंवा सुपरस्पेशालिटी ब्लाॅकमध्ये जागा उपलब्ध होईपर्यंत चार तासांहून अधिक वेळ ताटकळावे लागत आहे. मनपा, घाटीकडून खाटा वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, लक्षणे नसलेल्या रुग्णांकडूनही भरती करून घेण्यासाठी आग्रह होत असल्याने आरोग्य यंत्रणेसमोर प्राधान्यक्रमाचे आव्हान निर्माण झाले आहे.

लक्षणे नसणाऱ्यांनी भरतीचा आग्रह करू नये
होम आयसोलेशनची सुविधाही सुरू केली आहे. ज्या रुग्णांना लक्षणे नाहीत. सहविकृती, आजार नाही, अशा रुग्णांना नंतर बेड मिळणार नाही, या भीतीपोटी भरती होण्याचा आग्रह करू नये. अशा रुग्णांनी होम आयसोलेशनचा पर्याय स्वीकारावा, घरी उपचार घ्यावे. काही अडचण असेल तर कोविड केअर सेंटरवर दाखवावे. मात्र, ऑक्सिजनची गरज, लक्षणे किंवा देखरेखीखाली उपचार घेण्याची गरज असलेल्या रुग्णांना कोविड केअर सेंटरवर प्राधान्य मिळावे. त्यांची भरती व्हावी.
-डॉ. नीता पाडळकर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, महानगरपालिका

Web Title: Waiting for the patient to empty the bed; Queue of coroners at the Covid Care Center area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.