प्लेटलेट्ससाठी वेटींग

By Admin | Published: November 12, 2014 12:05 AM2014-11-12T00:05:38+5:302014-11-12T00:26:55+5:30

अविनाश मुडेगांवकर, अंबाजोगाई तालुका व परिसरात डेंग्यूचा वाढता उद्रेक सुरूच असल्याने रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांमध्ये प्लेटलेट्सचे प्रमाण झपाट्याने घटत आहे.

Waiting for platelets | प्लेटलेट्ससाठी वेटींग

प्लेटलेट्ससाठी वेटींग

googlenewsNext




अविनाश मुडेगांवकर, अंबाजोगाई
तालुका व परिसरात डेंग्यूचा वाढता उद्रेक सुरूच असल्याने रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांमध्ये प्लेटलेट्सचे प्रमाण झपाट्याने घटत आहे. त्यामुळे शासकीय व खाजगी रुग्णालयांमधून प्लेटलेट्सची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. अंबाजोगाईच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रुग्णांना शासकीय रक्तपेढीतून प्लेटलेट्स उपलब्ध होतात. तर खाजगी रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना लातूरचा हेलपाटा करावा लागतो. परिणामी लातूरच्या रक्तपेढयांमध्ये प्लेटलेट्स मिळवण्यासाठी वेटींग लिस्ट लावण्यात आली आहे.
अंबाजोगाई शहर व परिसरात गेल्या चार महिन्यांपासून डेंग्यूसदृश आजाराची साथ मोठ्या प्रमाणात फोफावली आहे. अंबाजोगाईच्या वैद्यकीय रुग्णालयात आठवडयाला किमान आठ ते दहा रुग्ण उपचारासाठी येतात. तर खाजगी रुग्णालयात जाणाऱ्या रुग्णांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. डेंग्यूच्या रुग्णांमध्ये प्रामुख्याने प्लेटलेट्सचे कमी होणारे प्रमाण यामुळे प्लेटलेट्स बाहेरून आणण्याची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अंबाजोगाईच्या वैद्यकीय महाविद्यालयात असणाऱ्या रुग्णांनी काही प्रमाणात या प्लेटलेट्स उपलब्ध होऊ शकतात. मात्र, खाजगी रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांना मात्र, लातूरचा हेलपाटा करावा लागतो. लातूरच्या रक्तपेढीमध्ये प्लेटलेट्सची मागणी मोठ्या प्रमाणात असल्याने वेटिंग लिस्ट प्रमाणे प्लेटलेट्सची वाट पाहात रुग्णांच्या नातेवाईकांना प्रतिक्षा करावी लागत आहे.
रुग्णांची वाढती
संख्या व रक्तदात्यांची कमतरता
रुग्णांची वाढती संख्या व रक्तदात्यांची कमतरता यामुळे प्लेटलेट्सची कमतरता मोठ्या प्रमाणावर जाणवू लागली आहे. रक्तपेढीत रक्तदान केल्यानंतर रक्तातील प्लेटलेट्स काढून घेण्याची प्रक्रिया तीन ते चार दिवस चालते. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रक्तपेढीत प्लेट्लेट्स काढून त्या रुग्णांना दिल्याही जातात. मात्र, रुग्णांची संख्या वाढल्यास व रक्तदात्यांची कमतरता यामुळे मोठी तफावत निर्माण होते. अशी प्रतिक्रिया वैद्यकीय महाविद्यालयाचे अधीक्षक डॉ.सिद्धेश्वर बिराजदार लोकमतशी बोलतांना म्हणाले.
प्लेटलेट्सची संख्या काही आजारांच्या रुग्णांमध्ये कमी होते. यामध्ये डेंग्यू प्रथम क्रमांकावर आहे.
४डेंग्यूबाधित रुग्णांच्या रक्तातून प्लेटलेट्सची संख्या झपाट्याने कमी होते. त्यापाठोपाठ कर्करोग झालेल्या रुग्णांना केमोथेरपी, रेडियोथेरपी करीत असताना प्लेटलेट्सची संख्या कमी होते.
४ दोन्ही प्रकारच्या रुग्णांकडून प्लेटलेट्सची सर्वाधिक मागणी असते. हृदयाची शस्त्रक्रिया, प्रसूतीदरम्यान जास्त रक्तस्त्राव झाल्यासही प्लेटलेट्स लागतात, अशी माहिती येथील हृदयरोगतज्ञ डॉ. शुभदा लोहिया यांनी लोकमतशी बोलताना दिली.
डेंग्यूने बीड शहरात थैमान घातले असल्याने रुग्णांची संख्या वाढत चालली आहे़
४यामुळे प्लेटलेटस्ची मागणी वाढली आहे़ पूर्वी दिवसाकाठी १० ते १२ रक्तविघटकांची मागणी केली जायची़
४मात्र आता ही मागणी २५ ते ३० पर्यंत वाढली असल्याचे रक्त संक्रमण अधिकारी डॉ़ जे़ ई़ बांगर यांनी सांगितले़

Web Title: Waiting for platelets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.