खेळाडूंची प्रतीक्षा संपली, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मैदानाचे लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2017 12:11 AM2017-11-26T00:11:21+5:302017-11-26T00:12:29+5:30

: ऐतिहासिक औरंगाबाद शहरातील नवीन रूपडे लाभलेल्या व हिरवा गालिचा असलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या गरवारे क्रीडा संकुलातील क्रिकेट मैदानावर आपले कौशल्य दाखवण्याची खेळाडूंची प्रतीक्षा अखेर आज संपली. शनिवारी सकाळी मान्यवरांच्या उपस्थितीत या मैदानाचा लोकार्पण सोहळा पार पडला.

Waiting for players to wait, release of international standard ground | खेळाडूंची प्रतीक्षा संपली, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मैदानाचे लोकार्पण

खेळाडूंची प्रतीक्षा संपली, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मैदानाचे लोकार्पण

googlenewsNext
ठळक मुद्दे‘लोकमत’ने फोडली वाचाया विषयाला ‘लोकमत’ने २० नोव्हेंबर रोजी वाचा फोडली होती. या वेळी महापौर नंदकुमार घोडेले यांनीदेखील मैदानाचा लोकार्पण सोहळा लवकर आयोजित करण्याचे संकेत ‘लोकमत’शी बोलताना दिले आणि त्यांच्या पुढाकाराने शनिवारी या मैदानाचा लोकार्पण सोहळा पार पडला.

औरंगाबाद : ऐतिहासिक औरंगाबाद शहरातील नवीन रूपडे लाभलेल्या व हिरवा गालिचा असलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या गरवारे क्रीडा संकुलातील क्रिकेट मैदानावर आपले कौशल्य दाखवण्याची खेळाडूंची प्रतीक्षा अखेर आज संपली. शनिवारी सकाळी मान्यवरांच्या उपस्थितीत या मैदानाचा लोकार्पण सोहळा पार पडला.
आज सकाळी खा. चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते या मैदानाचा लोकार्पण सोहळा पार पडला. या प्रसंगी महापौर नंदकुमार घोडेले हे अध्यक्षस्थानी होते, तर आ. अतुल सावे यांची विशेष उपस्थिती होती. या प्रसंगी उपमहापौर विजय औताडे, स्थायी समिती सभापती गजानन बारवाल, सभागृहनेता विकास जैन, सभापती सुरेखा सानप, गोकुळसिंग मलके नगरसेवक राजू शिंदे, उपायुक्त रवींद्र निकम, प्रकल्प समन्वयक अफसर सिद्दीकी आणि क्युरेटर नदीम मेमन उपस्थित होते.
यावेळी हे मैदान उभारण्यासाठी पुढाकार घेणारे आधीचे मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनाही आमंत्रित करण्यात आले. १ कोटी ३२ लाख रुपये खर्च झालेल्या या क्रिकेट मैदानावर ७ मुख्य आणि ३ सरावाच्या खेळपट्ट्या तयार करण्यात आल्या आहेत. या प्रसंगी महापौर नंदकुमार घोडेले यांनी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रिकेट मैदानामुळे ऐतिहासिक औरंगाबाद शहराच्या वैभवात आणखी भर पडली आहे. आजचा क्षण हा सोनेरी अक्षरांनी लिहावा असा आहे, असे महापौरांनी सांगितले. गरवारे क्रीडा संकुलातील सुविधांबाबत याआधी दुर्लक्ष झाल्याचे त्यांनी मान्य केले. क्रीडा क्षेत्रातही सुविधा निर्माण व्हाव्यात हीदेखील सामाजिक बांधिलकीच आहे. या क्रीडा संकुलाला आंतरराष्ट्रीय स्टेडियमचे स्वरूप यावे आपण पुढाकार घेऊ. यासाठी लागणाºया निधीविषयीचा प्रस्ताव राज्य व केंद्र शासनाकडे पाठवला जाईल, असे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे अंडर २३ वर्षांखालील भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणाºया व सध्या महाराष्ट्र रणजी संघाचा कर्णधार असणाºया अंकित बावणेसह राष्ट्रीय पातळीवरील खेळाडूंना त्यांच्या सरावासाठी हे मैदान मोफत उपलब्ध करण्यासाठी नियमावलीत तरतूद करू, असे महापौरांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
गरवारे क्रीडा संकुलातील रखडणारे स्विमिंग पूल आणि टेनिस बॉलसाठी मैदान तयार करण्याविषयी लक्ष घालणार असून, या मैदानासाठी मनपा निधी कमी पडू देणार नाही, असे घोडेले यांनी सांगितले. क्रिकेट मैदानावर आवश्यक असणारे ड्रेनेजलाइन आणि ड्रेसिंग रूमचेही काम पूर्ण होईल, असे आश्वासन त्यांनी दिले. त्याचप्रमाणे क्युरेटर नदीम मेमन यांचे तीन हप्त्यात बिल अदा करणार असल्याचे ते म्हणाले. याच सोहळ्यात खा. चंद्रकांत खैरे व आ. अतुल सावे यांनी या मैदानावर क्रिकेटशिवाय कोणतेही अन्य कार्यक्रम आयोजित करण्यात येणार नसल्याचे स्पष्ट केले. तसेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त १५ ते २५ जानेवारीदरम्यान क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्याची घोषणाही खा. खैरे यांनी या प्रसंगी केली. या प्रसंगी ओम प्रकाश बकोरिया यांनी महत्त्वपूर्ण सूचना केल्या.

‘लोकमत’ने फोडली वाचा
गरवारे क्रीडा संकुलातील क्रिकेट मैदानाला नवीन रूपडे मिळावे यासाठी याआधीचे मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी विशेष पुढाकार घेतला होता.
त्यानुसार गतवर्षी १३ डिसेंबर रोजी गरवारे क्रीडा संकुलातील क्रिकेट मैदानाचे नूतनीकरण करण्याची जबाबदारी आंतरराष्ट्रीय क्युरेटर नदीम मेमन यांच्याकडे सोपविण्यात आली होती. अवघ्या काही महिन्यांतच हे दर्जेदार मैदान तयार झाले.
तांत्रिक अडचण आणि उद्घाटन सोहळ्यामुळे खेळाडूंसाठी मात्र हे मैदान तीन महिन्यांपासून उपलब्ध होत नव्हते. या मैदानावर खेळाडू खेळण्यासाठी आतुर झाले होते.
अखेर या विषयाला ‘लोकमत’ने २० नोव्हेंबर रोजी वाचा फोडली होती. या वेळी महापौर नंदकुमार घोडेले यांनीदेखील मैदानाचा लोकार्पण सोहळा लवकर आयोजित करण्याचे संकेत ‘लोकमत’शी बोलताना दिले आणि त्यांच्या पुढाकाराने शनिवारी या मैदानाचा लोकार्पण सोहळा पार पडला.
त्यामुळे क्रिकेटपटूंसाठीदेखील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रिकेट मैदानावर खेळण्याचा मार्गही मोकळा झाला.

Web Title: Waiting for players to wait, release of international standard ground

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.