आज प्रतीक्षा संपणाऱ़़
By Admin | Published: May 15, 2014 11:38 PM2014-05-15T23:38:29+5:302014-05-16T00:17:26+5:30
नांदेड : लोकसभा निवडणुकीत मतदानाच्या महिनाभरानंतर शिगेला पोहोचलेली निकालाची उत्सुकता शुक्रवारी संपणार आहे़
नांदेड : लोकसभा निवडणुकीत मतदानाच्या महिनाभरानंतर शिगेला पोहोचलेली निकालाची उत्सुकता शुक्रवारी संपणार आहे़ नांदेड लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे अशोकराव चव्हाण आणि भारतीय जनता पार्टीचे डी़ बी़ पाटील यांच्यात सरळ लढत होत आहे़ या मतदारसंघातील निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे़ शहरातील तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या माहिती तंत्रज्ञान इमारतीत मोठ्या बंदोबस्तात शुक्रवारी सकाळी ८ वाजेपासून मतमोजणीला प्रारंभ होणार आहे़ प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय मतमोजणीच्या २० ते २४ फेर्या होणार आहेत़ यावेळी मतमोजणीसाठी १४ टेबल राहणार आहेत़ एका फेरीत १४ मतदान केंद्रावरील मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होणार आहे़ तंत्रनिकेतन महाविद्यालयामधील माहिती तंत्रज्ञान इमारतीच्या तळमजला आणि पहिल्या मजल्यावर मतमोजणी होणार आहे़ त्यात तळमजल्यावर भोकर, नांदेड उत्तर आणि नांदेड दक्षिण मतदारसंघाची आणि पहिल्या मजल्यावर नायगाव, देगलूर व मुखेड विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी होणार आहे़ यात प्रारंभी सकाळी ८ वाजेपासून टपाली मतपत्रिकेची मोजणी चार टेबलवर आहे़ मतमोजणीसाठी १०२ पर्यवेक्षक, १०२ मतमोजणी सहायक, १२५ सुक्ष्मनिरीक्षक आणि ३०० इतर अधिकारी-कर्मचारी असे एकूण ६३० कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत़ मतमोजणी प्रक्रियेवर निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी धीरजकुमार हेही स्वत: लक्ष ठेवून राहणार आहेत़ या मतमोजणी प्रक्रियेची राऊंडनिहाय माहिती लाऊडस्पीकरद्वारे घोषीत करण्यात येणार आहे़ लॉ कॉलेज, नवा मोंढा रस्ता, आनंदनगर रस्ता आणि महात्मा फुले शाळा येथे लाऊडस्पीकरची व्यवस्था करण्यात आली आहे़ तसेच मतमोजणीबाबत नांदेड एफ एम रेडिओवरही माहिती दिली जाणार असून स्थानिक केबल वाहिनीवर स्ट्रीपद्वारे फेरीनिहाय मतमोजणी प्रसारित करण्यात येईल़ (प्रतिनिधी) निकाल वेबसाईटवरही मतमोजणीचा निकाल तातडीने सर्वांपर्यंत पोहचावा यासाठी राष्ट्रीय सुचना केंद्र अर्थात् एनआयसीच्या माध्यमातून नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयातच्या ६६६.ल्लंल्लीि.िॅङ्म५.्रल्ल या संकेतस्थळावर मतमोजणीची फेरनिहाय माहिती क्षणाक्षणाला अपडेट केली जाणार आहे़ यासाठी एनआयसीच्या प्रमुख भुसारी यांच्यासह त्यांची यंत्रणा सज्ज झाली आहे़ लोकसभा निवडणूकीत जिल्हा निवडणूक यंत्रणेने माहिती तंत्रज्ञानाद्वारे अनेक उपक्रम राबवले आहेत़