औरंगाबादेतील चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाला १० वर्षांपासून पाण्याची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2018 10:54 PM2018-10-06T22:54:06+5:302018-10-06T22:54:58+5:30

औरंगाबाद : शहराच्या वाहतूक क्षेत्राला भरभराटी देणाऱ्या चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाला गेल्या दहा वर्षांपासून पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. ...

Waiting for water for 10 years at Chikalthana International Airport in Aurangabad | औरंगाबादेतील चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाला १० वर्षांपासून पाण्याची प्रतीक्षा

औरंगाबादेतील चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाला १० वर्षांपासून पाण्याची प्रतीक्षा

googlenewsNext
ठळक मुद्दे टँकरवरच भिस्त : समांतर जलवाहिनीनंतर पाणी देण्याचे मनपाचे अजब उत्तर

औरंगाबाद : शहराच्या वाहतूक क्षेत्राला भरभराटी देणाऱ्या चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाला गेल्या दहा वर्षांपासून पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. प्राधिकरणाने पाण्यासाठी महापालिके कडे ४ इंच जलवाहिनी जोडणीची मागणी केली; परंतु समांतर जलवाहिनीनंतरच पाणी देणे शक्य असल्याचे अजब उत्तर मनपाने दिले आहे. परिणामी विमानतळ टँकरवर अवलंबून असून त्यातून अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.
विमानतळाला सध्या पुरवठा होणारे पाणी अपुरे पडत आहे. दररोज सुमारे २५ हजार लिटर पाण्याची गरज आहे. त्यामुळे प्राधिकरणाकडून वारंवार महापालिकेकडे ४ इंची जलवाहिनीची जोडणी देण्याची मागणी केली जात आहे. विमानतळावर शुक्रवारी झालेल्या बैठकीतही संचालक डी.जी. साळवे यांनी हा मुद्दा उपस्थित केला. विभागीय आयुक्तांनी पाणी देण्याची सूचना केली आहे. दहा वर्षांपासून मागणी करीत आहोत. तरीही पाण्याचा प्रश्न काही केल्या सुटत नाही. त्यामुळे पाणी विकत घेण्याची वेळ येत आहे.
टँकरच्या पाण्यामुळे विमानतळावर अनेक प्रश्न निर्माण होत आहे. पाणी कडू लागत असल्याच्या तक्रारी प्रवाशांतून होत आहे, असे असतानाही समांतर जलवाहिनी झाल्याशिवाय पाणी देणार नसल्याचे पत्र देण्यात आल्याचे डी.जी. साळवे यांनी बैठकीत सांगितले. बैठकीत उपस्थित महापालिकेच्या अधिकाºयांनीही समांतरनंतरच पाणी देता येईल, याचा पुनरुच्चार केला. कोट्यवधींचा कर घेऊनही मनपा विमानतळाला पाणी देण्याची खबरदारी घेत नसल्याचे दिसते.
‘मिनी घाटी’ला हवे जादा पाणी
चिकलठाणा येथील मिनी घाटी म्हणजे जिल्हा सामान्य रुग्णालयात सध्या ४ इंचाची जोडणी आहे. सध्या केवळ बाह्यरुग्ण विभाग सुरूआहे. त्यामुळे मनपाकडून देण्यात येणारे पाणी पुरेसे ठरत आहे; परंतु येथे आंतररुग्ण विभाग सुरूकेला जाणार आहे. हा विभाग सुरूझाल्यानंतर अधिक पाणी लागणार आहे. त्यासाठी सिडकोतील पाण्याच्या जलकुंभावरून थेट रुग्णालयासाठी जलवाहिनी देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जलवाहिनीसाठीची फाईल शासनाक डे गेली आहे. निधी मंजूर झाल्यानंतर जलवाहिनीचे काम होईल,असे जिल्हा रुग्णालयातर्फे सांगण्यात आले.
‘आयपीडी’नंतर अडचण
जिल्हा सामान्य रुग्णालयात सध्या बाह्यरुग्ण विभाग सुरूआहे. त्यामुळे आजघडीला पाणी पुरेसे ठरत आहे. रुग्णालयात आंतररुग्ण विभाग सुरूझाल्यानंतर मात्र पाण्याच्या अडचणीला सामोरे जावे लागेल.
-एस. व्ही. कुलकर्णी, जिल्हा शल्यचिकित्सक

Web Title: Waiting for water for 10 years at Chikalthana International Airport in Aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.