वाळूमाफियांची दादागिरी!

By Admin | Published: November 14, 2016 12:37 AM2016-11-14T00:37:53+5:302016-11-14T00:35:20+5:30

कुंभार पिंपळगाव : घनसावंगी तालुक्यातील गोदावरी नदीतून बेसुमार अवैध वाळू उपसा होत आहे

Walmafia's bullying! | वाळूमाफियांची दादागिरी!

वाळूमाफियांची दादागिरी!

googlenewsNext

कुंभार पिंपळगाव : घनसावंगी तालुक्यातील गोदावरी नदीतून बेसुमार अवैध वाळू उपसा होत आहे. या प्रकाराकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत असले तरी महसूल विभाग कारवाई करीत आहे. मात्र, वाळू माफियांची दादागिरी वाढल्याचे चित्र आहे. शनिवारी रात्री वाळू माफियांनी महसूल पथकावर हल्ला केल्याने खळबळ उडाली आहे.
मागील अनेक दिवसांपासून तालुक्यातील सुरू असलेला अवैध वाळू उपसा थांबता थांबत नाही. तहसीलदार कैलास अंडिल यांनी पदभार स्वीकारताच महसूल पथक स्थापन करून स्वत:ही पथकासोबत रात्रभर कार्यवाही सुरू केली आहे. याची धास्ती घेत वाळू माफियांनी घेतली आहे. मात्र, काही वाळू पट्ट्यात वाळू माफिया मोठ्या प्रमाणात सक्रिय आहेत. याचा त्रास महसूल प्रशासनाला होत आहे. राजाटाकळी, भादली, शिवणगाव, या गावातील चालू असलेल्या अवैध वाळू तस्करीला कारवाई म्हणून पकडलेली वाहने सोडले नसल्याने व कार्यवाहीच्या माध्यमातून अवैध वाळू वाहतुकीला आळा बसला होता. तहसीलदारांनी वाळू उपसा व वाहतुकीवर बंदी केल्याने अस्वस्थ झालेल्या वाळुमाफियांनी प्रशासनाच्या विरोधात भूमिका घेत असल्याचे काही घटनावरून समोर येत होते. त्यातीलच शनिवारी रात्री उशिरा झालेल्या घटनेमुळे आणखीनच भर पडली आहे. चार महिन्यांपासून महसूल पथक दररोज रात्री वाळू वाहतुकीच्या मध्यस्थीच्या पॉइंटवर पाळत ठेवून आहे. या पथकात तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी, कोतवालासह अनेकांचा समावेश असायचा. तर मध्यंतरी पोलिसांचे सहकार्यही महसूल प्रशासनाला मिळत नसल्याचे अनेक पत्र पोलीस खात्याच्या वरिष्ठांनाही देण्यात आल्याचे सूत्रांकडून माहिती मिळाली. परंतु वाळू तस्करीत पोलीस खाते मदत करत नसल्याने अखेर तहसीलदारांनी आपल्याच खात्याचे पथक तयार केले आणि वाळू उपसा वाहतुकीस पायबंद घालण्याचा प्रयत्न करीत आहेत. (वार्ताहर)

Web Title: Walmafia's bullying!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.