वाळूज महानगरात विनामास्क २५० नागरिकांकडून दंड वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:06 AM2021-03-13T04:06:29+5:302021-03-13T04:06:29+5:30

वाळूज महानगर : वाळूज महानगरातील ग्रामपंचायतींकडून मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. दोन दिवसात २५० नागरिकांवर ...

In Waluj metropolis, fines were collected from 250 unmasked citizens | वाळूज महानगरात विनामास्क २५० नागरिकांकडून दंड वसूल

वाळूज महानगरात विनामास्क २५० नागरिकांकडून दंड वसूल

googlenewsNext

वाळूज महानगर : वाळूज महानगरातील ग्रामपंचायतींकडून मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. दोन दिवसात २५० नागरिकांवर कारवाई करुन २५ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

वडगाव - बजाज नगरात सरपंच सचिन गरड, उपसरपंच उषा हांडे, गटविकास अधिकारी प्रकाश दाभाडे, सहाय्यक गटविकास अधिकारी अंबादास गायके, विस्तार अधिकारी शिवाजी साळुंके, ग्रामविकास अधिकारी गणेश धनवई आदींच्या उपस्थितीत ही माेहीम सुरु करण्यात आली. रांजणगाव शेणपुंजीत सरपंच कांताबाई जाधव, उपसरपंच शिवराम ठोंबरे, ग्रामविकास अधिकारी एस. एन. रोहकले, जिल्हा परिषद सदस्य उषा हिवाळे, पंचायत समिती सदस्य दीपक बडे, ग्रामपंचायत सदस्य अशोक जाधव आदींच्या उपस्थितीत मोहीम सुरु करण्यात आली. वडगाव - बजाज नगरात ९० जणांवर तर रांजणगावमध्ये १६२ जणांवर कारवाई करण्यात आली. कोरोनाची साथ आटोक्यात आणण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करुन मास्क वापरण्याचे आवाहन ग्रामपंचायतींकडून करण्यात आले आहे.

फोटो ओळ

बजाज नगरात विनामास्क फिरणारे वाहनचालक व नागरिकांकडून ग्रामपंचायतीच्या पथकाने दंड वसूल केला.

फोटो क्रमांक- कारवाई १/२/३

----------------------

Web Title: In Waluj metropolis, fines were collected from 250 unmasked citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.