सातव की वानखेडे? आज फैसला होणार
By Admin | Published: May 15, 2014 11:39 PM2014-05-15T23:39:53+5:302014-05-16T00:17:42+5:30
हिंगोली : अखिल भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष आ. राजीव सातव यांच्यामुळे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या हिंगोली लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीत आ. सातव विजयी होणार की, खा. सुभाष वानखेडे, याचा फैैसला
हिंगोली : अखिल भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष आ. राजीव सातव यांच्यामुळे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या हिंगोली लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीत आ. सातव विजयी होणार की, खा. सुभाष वानखेडे, याचा फैैसला शुक्रवारी दुपारी १२ वाजेपर्यंत होणार आहे. या निवडणुकीच्या निकालानंतर जिल्ह्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता राजकीय वर्तूळातून वर्तविली जात आहे. हिंगोली लोकसभा मतदार संघाच्या आतापर्यंत झालेल्या १० निवडणुकांमध्ये काँग्रेस व शिवसेनेने प्रत्येकी ४ वेळा तर राष्टÑवादी व जनता पक्षाने प्रत्येकी एक वेळा विजय मिळविला आहे. काँग्रेस- शिवसेनेने आतापर्यंत बरोबरी साधल्यानंतर आता पाचव्यांदा कोणता पक्ष विजय मिळवेल, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. अखिल भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष आ. राजीव सातव पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. आ. सातव यांच्यामुळे हिंगोली लोकसभा मतदारसंघ देशभरात लक्षवेधी बनला आहे. दुसर्यांदा हिंगोली लोकसभेतून विजय मिळू पाहणारे शिवसेनेचे खा. सुभाष वानखेडे यांच्यासमोर आ. सातव यांनी जोरदार आव्हान निर्माण केले. या निवडणुकीत आ. सातव यांच्या विजयासाठी जसे शिवसेनेतील काही नेत्यांनी प्रयत्न केले, तसे खा. वानखेडे यांच्या विजयासाठी काँग्रेस व राष्टÑवादीच्याही काही नेत्यांनी प्रयत्नांची पराकाष्टा केली. त्यामुळे ही निवडणूक वेगळ्याच अर्थाने चर्चेला आली. आघाडी धर्म व पक्षनिष्ठा बाजूला टाकून वैैयक्तिक द्वेषापोटी निवडणुकीतील उमेदवारांना पराभूत करण्याचा चंग बांधलेल्या नेतेमंडळींसाठीही ही निवडणूक अत्यंत महत्वाची आहे. त्यामुळे या निवडणुकीनंतर जिल्ह्याच्या राजकारणात बर्याच घडामोडी होणार असल्याचा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे. या निवडणुकीचा परिणाम पाच महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीवरही होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेकांचे राजकीय भवितव्य या निवडणुकीतून ठरणार आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांचे लक्ष लागले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)