मतदान करायचेय, आधी थोडं फिरून येऊ! सुट्ट्यांमुळे ‘एमटीडीसी’चे रिसाॅर्ट १५ नोव्हेंबरपर्यंत फुल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2024 07:10 AM2024-10-31T07:10:00+5:302024-10-31T07:10:41+5:30

MTDC : केरळ, उटी, काश्मीर तसेच महाराष्ट्रात कोकण भाग  जास्त गजबजणार आहे. तर आंतरराष्ट्रीय पर्यटनासाठी दुबई, सिंगापूर, श्रीलंका, व्हिएतनाम, थायलंड, बाली या ठिकाणांना पर्यटकांची पसंती आहे.

Want to vote, let's take a walk first! Due to holidays, MTDC's resort is full till 15th November | मतदान करायचेय, आधी थोडं फिरून येऊ! सुट्ट्यांमुळे ‘एमटीडीसी’चे रिसाॅर्ट १५ नोव्हेंबरपर्यंत फुल

मतदान करायचेय, आधी थोडं फिरून येऊ! सुट्ट्यांमुळे ‘एमटीडीसी’चे रिसाॅर्ट १५ नोव्हेंबरपर्यंत फुल

छत्रपती संभाजीनगर : यंदा दिवाळीनंतर अवघ्या काही दिवसांनी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. मतदानापूर्वी पर्यटनाचे नियोजन शहरवासीयांकडून करण्यात आले आहे. यात कमी दिवसांत होणाऱ्या पर्यटनस्थळांना सर्वाधिक पसंती दिली जात आहे. त्याबरोबर अनेकांनी आंतरराष्ट्रीय पर्यटनाचे नियोजन केले आहे.   

ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ औरंगाबादचे अध्यक्ष मंगेश कपोते म्हणाले, दिवाळीतील कमी सुट्या आणि त्यात विधानसभा निवडणुकीमुळे यंदा ज्या ठिकाणी प्रवास वेळ कमी लागेल, अशा ठिकाणी  पर्यटक जाण्यास पसंती देत आहेत. त्यात कोकण हा पर्यटकांनी अधिक गजबजणार आहे.

केरळ, उटी, काश्मीर तसेच महाराष्ट्रात कोकण भाग  जास्त गजबजणार आहे. तर आंतरराष्ट्रीय पर्यटनासाठी दुबई, सिंगापूर, श्रीलंका, व्हिएतनाम, थायलंड, बाली या ठिकाणांना पर्यटकांची पसंती आहे.

भारतालाच प्राधान्य
टुरिझम डेव्हलपमेंट फाउंडेशनचे अध्यक्ष जसवंत सिंग म्हणाले, दिवाळी सुट्यांत पर्यटक देशातील स्थळांना प्राधान्य देत आहे. 
गोवा,  राजस्थान, केरळ, अयोध्या, वाराणसीला जाण्यास पसंती आहे. स्वत:च्या वाहनाने महाबळेश्वर, माथेरान, लोणावळा, खंडाळा येथे जाण्याचे नियोजन शहरवासीयांनी केले आहे.

विदेशातील स्थळांना पर्यटकांची पसंती
गोव्यासह केरळ, राजस्थान, अंदमान, आसाम, मेघालय, काश्मीर, उटी, अरुणाचल आणि आंतरराष्ट्रीय पर्यटनात व्हिएतनाम, दुबई, ऑस्ट्रेलिया, सिंगापूरला पर्यटकांकडून पसंती दिली जात आहे, अशी माहिती मराठवाडा पर्यटन विकास संघटनेचे अध्यक्ष जयंत गोरे यांनी दिली. 

पर्यटकांचा प्रतिसाद
१५ तारखेपर्यंत सर्व रिसॉर्ट फुल आहेत. छत्रपती संभाजीनगरसह फर्दापूर, अजिंठा, लोणार, वेरुळ येथील रिसाॅर्टमध्ये पर्यटकांची बुकिंग वाढली आहे. यात लोणार येथील रिसाॅर्ट १०० टक्के फुल झाले आहे.
- दीपक हरणे, प्रादेशिक व्यवस्थापक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ
 

Web Title: Want to vote, let's take a walk first! Due to holidays, MTDC's resort is full till 15th November

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.