उसन्या पैशांच्या बदल्यात हवे होते घर; सख्ख्या बहिणीनेच सुपारी देऊन काढला भावाचा काटा

By सुमित डोळे | Published: November 4, 2023 06:22 PM2023-11-04T18:22:22+5:302023-11-04T18:23:04+5:30

सासरकडील नात्यातीलच लोकांना दिली सुपारी, मोठ्या भावाची केली क्रूर हत्या

wanted a house in exchange for debt money; It was sibling sister who killed her eleder brother by giving contract killing | उसन्या पैशांच्या बदल्यात हवे होते घर; सख्ख्या बहिणीनेच सुपारी देऊन काढला भावाचा काटा

उसन्या पैशांच्या बदल्यात हवे होते घर; सख्ख्या बहिणीनेच सुपारी देऊन काढला भावाचा काटा

छत्रपती संभाजीनगर : बेगमपूर येथील लाल मंडीत राहणाऱ्या जगदीश फतेलष्कर (४२) यांचा बुधवारी मकाई गेट पुलाखाली संशयास्पदरीत्या मृतदेह आढळला होता. त्यांचा उजवा पाय, मणका तुटेपर्यंत गंभीर मारहाण करून त्यांचा खून केल्याचे तपासात शुक्रवारी निष्पन्न झाले.

जगदीश यांना मुलीच्या लग्नात हातउसने दिलेल्या ३ लाखांच्या बदल्यात १० लाखांची मागणी करणारी लहान सख्खी बहीण रिना राजेश यादव (वय ३५) हिने अकोटच्या वसुलीबाजांना सुपारी देऊन जगदीश यांचा खून घडवून आणला. शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत पोलिस अकोट येथे रिनासह मारेकऱ्यांचा शोध घेत होते.

किराणा चावडीत असणाऱ्या दुकानात काम करणारे जगदीश दोन मुले, पत्नी, आई, वडील, भाऊ व भावजयीसह राहात होते. त्यांचे कुटुंब परिसरातच मेस चालवते. आठ महिन्यांपूर्वी जगदीश यांच्या मुलीचे लग्न झाले. तेव्हा पैशांची गरज पडल्याने त्यांनी रिनाकडून ३ लाख रुपये घेतले होते. तेव्हा मदत म्हणून दिलेले पैसे रिनाने ३० टक्के व्याजासह परत मागितले. जगदीश पैशांसाठी प्रयत्न करत होते. मात्र, रिना हिने सासरकडील नात्यातीलच तरुण रितेश मंडले, रामलाल मंडले उर्फ यादव, त्याची आई रमा यांच्या मदतीने धमकावणे सुरू केले. ३१ ऑक्टोबर रोजी तिघांनी काही गुंडांसह त्यांच्या घरी जाऊन शिवीगाळ केली. १ नोव्हेंबर रोजी पुन्हा दुपारी त्यांनी जगदीश यांचे घर गाठले. रितेश याने अचानक त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरू केली. आईलाही डोळ्यात तिखट टाकून मारण्याची धमकी दिली. त्यानंतर सोबत वसुलीसाठी आलेल्या गुंडांनी जगदीश यांना बळजबरीने कारमध्ये नेले.

तिकडे भावाची हत्या, इकडे बहिणीचा बॉण्डमध्ये जीव
रिना, रितेशच्या गुंडांनी जगदीश यांना अज्ञात ठिकाणी नेऊन बेदम मारहाण केली. तर रिना, रितेश यांनी त्यांचा लहान भाऊ योगेशला घराचा ताबा घेण्यासाठी बॉण्ड करून दे म्हणत जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात नेले. तोपर्यंत जगदीश यांची हत्या करून गुंडांनी त्यांना मकाई गेट उड्डाणपुलाखाली फेकून दिले. तिकडे योगेशची सही होताच रिना बॉण्ड घेऊन पसार झाली. वर्दळीच्या परिसरात जगदीश यांचा मृतदेह फेकताना कोणीच कसे पाहिले नाही, असाही प्रश्न पोलिसांना पडला आहे.

Web Title: wanted a house in exchange for debt money; It was sibling sister who killed her eleder brother by giving contract killing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.