'आयपीएस व्हायच होतं, पण...'; १३ वर्षीय दिक्षाने अचानक संपविले जीवन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2023 04:27 PM2023-03-28T16:27:45+5:302023-03-28T16:38:10+5:30

आष्टी तालुक्यातील बीडसांगवी येथील घटना 

'Wanted to be IPS, but...'; 13-year-old Diksha suddenly ended his life | 'आयपीएस व्हायच होतं, पण...'; १३ वर्षीय दिक्षाने अचानक संपविले जीवन

'आयपीएस व्हायच होतं, पण...'; १३ वर्षीय दिक्षाने अचानक संपविले जीवन

googlenewsNext

- नितीन कांबळे 
कडा (बीड) :
आजोळी राहत असलेल्या एका १३ वर्षीय मुलीने राहत्या घरी ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सायंकाळी ६ वाजेच्या दरम्यान ससे वस्तीवर घडली. दिक्षा बाबासाहेब शेलार असे मृत मुलीचे नाव आहे. 

आष्टी तालुक्यातील कारखेल बुद्रुक येथील दिक्षा बाबासाहेब शेलार ही बीडसांगवी येथील ससे वस्तीवरील आजोळी दुसरीत असल्यापासून आजोबा, मामाकडे राहत होती. दीक्षाचे आई, वडील उसतोड कामगार असल्याने मामा तिचा सांभाळ करत. दरम्यान, सोमवारी घरातील सर्वजण शेतात काम करत होते. घरी एकटीच असलेल्या दिक्षाने सायंकाळ ६ वाजेच्या दरम्यान ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन जीवन संपवले.  

माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस निरीक्षक हेमंत कदम यांनी भेट दिली. तर पोलीस हवालदार विकास राठोड यांनी पंचनामा केला. आष्टी पोलिस ठाण्यात आकस्मिक मुत्यूची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्या का व कोणत्या कारणाने केली हे मात्र समजू शकले नाही. या प्रकरणी पुढील तपास महिला पोलिस अंमलदार निशा घुले करीत आहेत.

घटनास्थळी आढळून आली सुसाईट नोट
"मला आयपीएस व्हायच होतं झाले नाही. माझं सगळ संपल माझ्या ताईला कारखेलला घेऊन जा मी चालले..." असे लिहलेली सुसाईट नोट आढळून आली आहे.

Web Title: 'Wanted to be IPS, but...'; 13-year-old Diksha suddenly ended his life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.