वारकरी दिंडीने वेधले लक्ष
By Admin | Published: May 30, 2017 12:30 AM2017-05-30T00:30:29+5:302017-05-30T00:31:54+5:30
लातूर : सहाव्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनानिमित्त सोमवारी सकाळी भव्य दिंडी सोहळा गौरीशंकर मंदिरापासून निघाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
लातूर : सहाव्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनानिमित्त सोमवारी सकाळी भव्य दिंडी सोहळा गौरीशंकर मंदिरापासून निघाला. दिंडीत पारंपरिक वेशभूषेत वारकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. महिला-पुरुषांच्या २२ दिंड्या यात सहभागी झाल्या. या संतमेळ्याने लातूरकरांचे लक्ष वेधून घेतले. प्रारंभी दिंडी सोहळ्याचे उद्घाटन आमदार दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.
गौरीशंकर मंदिरापासून निघालेली ही भव्य दिंडी सराफ लाईन, गंजगोलाई, सुभाष चौक, हनुमान चौक, गांधी चौक मार्गे मारवाडी राजस्थान विद्यालयाच्या प्रांगणात संमेलनस्थळी पोहोचली. या दिंडी स्पर्धेत राज्यभरातील २२ दिंड्या सहभागी झाल्या होत्या. पारंपरिक वेशभूषेत आणि अत्यंत शिस्तबद्ध निघालेल्या या दिंडीने लातूरकरांचे लक्ष वेधून घेतले. दिंडीतील विजेत्यांना अनुक्रमे प्रथम ५१ हजार, द्वितीय ३१ हजार, तृतीय २१ हजार आणि उत्तेजनार्थ ११ हजार रुपये अशी पारितोषिके दिली जाणार आहेत.