वॉर्ड आरक्षणात कहीं खुशी, कहीं गम; 'या' दिग्गजांना बसला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2020 04:22 PM2020-02-04T16:22:11+5:302020-02-04T16:47:00+5:30

महापौर नंदकुमार घोडेले यांचा इटखेडा वॉर्ड सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित झाला आहे.

in the ward reservation, some happiness some sarrow; This 'Giants' suffers | वॉर्ड आरक्षणात कहीं खुशी, कहीं गम; 'या' दिग्गजांना बसला फटका

वॉर्ड आरक्षणात कहीं खुशी, कहीं गम; 'या' दिग्गजांना बसला फटका

googlenewsNext
ठळक मुद्देविष्णूनगर वॉर्ड नावालाच शिल्लक आहे. या वॉर्डाचा ९० टक्केभाग बौद्धनगर-उत्तमनगरला जोडला आहे. ज्येष्ठ नगरसेवक राजू वैद्य यांचा विद्यानगर वॉर्ड नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी आरक्षित झाला आहे.

औरंगाबाद : भाजपचे राजू शिंदे, शिवसेनेचे त्र्यंबक तुपे यांची सोय झाली आहे. शिंदे यांचा पूर्वीचा ३८ क्रमांकाचा आणि सुधारित २३ क्रमांकाचा वॉर्ड एमआयडीसी चिकलठाणा अनुसूचित जमातीसाठी आरक्षित झाला आहे. २०१५ च्या निवडणुकीतही हा वॉर्ड याच प्रवर्गासाठी आरक्षित होता. तुपे यांचा जुना वॉर्ड क्रमांक ७५ बौद्धनगर-उत्तमनगर असलेला वॉर्ड आता ७३ क्रमांकावर असून, मागील निवडणुकीप्रमाणे सर्वसाधारण प्रवर्गासाठी सुटला आहे. भाजपचे गटनेते प्रमोद राठोड यांचा विश्रांतीनगर वॉर्ड सर्वसाधारण महिलांसाठी राखीव झाला असून, त्यांचा जुना वॉर्ड ७६ एन-३, एन-४ पारिजातनगर नागरिकांचा मागास प्रवर्ग यासाठी राखीव झाला. विष्णूनगर वॉर्ड नावालाच शिल्लक आहे. या वॉर्डाचा ९० टक्केभाग बौद्धनगर-उत्तमनगरला जोडला आहे. 

महापौर नंदकुमार घोडेले यांचा इटखेडा वॉर्ड सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित झाला आहे. मात्र, शेजारी कांचनवाडी-नक्षत्रवाडी हा वॉर्ड नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित झाला असल्यामुळे त्यांची सोय झाली आहे. ईटखेडा वॉर्डात घोडेले कुटुंबातील महिला नशीब अजमावू शकतात. उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांचा शिवाजीनगर वॉर्ड अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाला आहे. सभागृहनेते विकास जैन यांचा वेदांतनगर वॉर्ड महिलांसाठी आरक्षित झाला आहे. पुढील महापौर खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव आहे. त्यामुळे जैन यांनी वॉर्ड सोयीचा करून घेतल्याची चर्चा आहे. विरोधी पक्षनेत्या सरिता बोर्डे यांचा क्रांतीनगर उस्मानपुरा वॉर्ड खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झाला आहे. स्थायी समिती सभापती जयश्री कुलकर्णी यांचा जवाहर कॉलनी वॉर्ड नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित झाला आहे.

ज्येष्ठ नगरसेवक राजू वैद्य यांचा विद्यानगर वॉर्ड नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी आरक्षित झाला आहे. त्यांचा जुना क्रांतीचौक वॉर्ड अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाला आहे. माजी महापौर भगवान घडामोडे यांचा रामनगर वॉर्ड सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाला आहे. आणखी एक माजी महापौर गजानन बारवाल यांचा पदमपुरा वॉर्ड इतर मागासवर्ग महिलांसाठी आरक्षित झाला आहे. माजी उपमहापौर विजय औताडे यांचा मयूरपार्क  वॉर्ड अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाला आहे. काँग्रेसचे गटनेते भाऊसाहेब जगताप यांचा अंबिकानगर वॉर्ड सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित झाला आहे. शिवसेनेचे गटनेते मकरंद कुलकर्णी यांचा गणेशनगर वॉर्ड ओबीसी महिलांसाठी आरक्षित झाला आहे. एमआयएमचे गटनेते गंगाधर ढगे यांचा भडकलगेट बुढीलेन वॉर्ड खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित झाला आहे. माजी सभापती मोहन मेघावाले यांचा रोजाबाग-भारतनगर वॉर्डदेखील आरक्षित झाला आहे. 

वॉर्ड आरक्षणाचा या विद्यमान नगरसेवकांना बसला फटका
नगरसेवक, कंसात आरक्षित वॉर्ड
पूनम बमणे (सर्वसाधारण महिला), राजगौरव वानखेडे (सर्वसाधारण महिला), सीताराम सुरे (अनुसूचित जाती महिला), सचिन खैरे (इतर मागासवर्ग महिला), प्रेमलता दाभाडे (नागरिकांचा इतर मागासवर्ग महिला), अफसर खान (सर्वसाधारण महिला), नासेर सिद्दीकी (सर्वसाधारण महिला), जमीर कादरी (अनुसूचित जाती महिला), सीमा खरात (नागरिकांचा इतर मागासवर्ग), नितीन चित्ते (महिला), गोकुळसिंग मलके (महिला), फेरोज खान (नागरिकांचा इतर मागासवर्ग महिला), राजू तनवाणी (नागरिकांचा इतर मागासवर्ग महिला), कीर्ती शिंदे (अनुसूचित जाती महिला), शिवाजी दांडगे (महिला), ऋषिकेश खैरे (नागरिकांचा इतर मागासवर्ग महिला), माधुरी अदवंत (नागरिकांचा मागास प्रवर्ग), सत्यभामा शिंदे (अनुसूचित जाती), मनीषा मुंडे (अनुसूचित जाती), दिलीप थोरात (महिला), सुमित्रा हाळनोर (अनुसूचित जाती), सिद्धांत शिरसाट (महिला), कैलास गायकवाड (नागरिकांचा इतर मागासवर्ग महिला), अप्पासाहेब हिवाळे (अनुसूचित जाती महिला), सायली जमादार (अनुसूचित जाती) यांचे वॉर्ड आरक्षित झाल्यामुळे त्यांना इतर वॉर्डांचा शोध घ्यावा लागणार आहे. 

Web Title: in the ward reservation, some happiness some sarrow; This 'Giants' suffers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.