उद्योगनगरीत इलेक्ट्रॉनिक्सचे गोदाम फोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:05 AM2021-06-05T04:05:26+5:302021-06-05T04:05:26+5:30
:सव्वा अकरा लाखाचा माल लांबविला वाळूज महानगर : इलेक्ट्रॉनिक्स साहित्याचे गोदाम फोडून चोरट्यांनी जवळपास सव्वाअकरा लाख रुपये किमतीचे महागडे ...
:सव्वा अकरा लाखाचा माल लांबविला
वाळूज महानगर : इलेक्ट्रॉनिक्स साहित्याचे गोदाम फोडून चोरट्यांनी जवळपास सव्वाअकरा लाख रुपये किमतीचे महागडे साहित्य लांबविल्याची घटना बुधवारी (दि.२) सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी गोदाम मालकाच्या तक्रारीवरून चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुरजितसिंग हरबन्ससिंग छाबरा (५९ रा. इटखेडा) यांचे मोरे चौकात इलेक्ट्रॉनिक्सचे दुकान आहे. या दुकानात विक्रीसाठी आणलेले नामांकित कंपन्याचे एलईडी टीव्ही, एअर कंडिशनर, फ्रीज आदी ठेवण्यासाठी छाबरा यांनी वाळूज एमआयडीसील प्लॉट नंबर सी-२७४ या ठिकाणी गोदामात ठेवले होते. दरम्यान, बुधवारी सकाळी ९ वाजता ते दुकानत आले. तेव्हा त्यांचा मुलगा माल आणण्यासाठी गोदामात गेला. तेव्हा ह. प्रकार उघडकीस आला. या चोरी झालेल्या मालाची बिले प्राप्त झाल्यानंतर सुरजितसिंग छाबरा यांनी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.