सावधान, औरंगाबादच्या हवेची गुणवत्ता धोक्याकडे! सिमेंटचे जंगल, औद्योगिकरण, प्रदूषण वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2022 06:10 PM2022-03-09T18:10:33+5:302022-03-09T18:12:32+5:30

शहराचा एअर क्वालिटी इंडेक्स मंगळवारी १०१ होता. त्यामुळे आपण हळूहळू धोक्याच्या पातळीकडे सरकतोय

Warning, Aurangabad's air quality at risk! Cement forest, industrialization, pollution increased | सावधान, औरंगाबादच्या हवेची गुणवत्ता धोक्याकडे! सिमेंटचे जंगल, औद्योगिकरण, प्रदूषण वाढले

सावधान, औरंगाबादच्या हवेची गुणवत्ता धोक्याकडे! सिमेंटचे जंगल, औद्योगिकरण, प्रदूषण वाढले

googlenewsNext

औरंगाबाद : शहरात वाढणारे सिमेंटचे जंगल, औद्योगिकीकरण, वाहनांमधून पडणाऱ्या विषारी धुरामुळे शहराच्या हवेची गुणवत्ता आता धोक्याच्या पातळीकडे हळूहळू वाढू लागली आहे. यासंदर्भात वेळीच उपाययोजना न केल्यास औरंगाबादची हवा दिल्लीसारखी होण्यास फार वेळ लागणार नाही.

शहराचा एअर क्वालिटी इंडेक्स- १०१, इंडेक्स १०० पेक्षा कमी हवा
शहराचा एअर क्वालिटी इंडेक्स ० ते १०० पर्यंत असेल तर हवा शुद्ध आहे, असे म्हणायला हरकत नाही. शहराचा एअर क्वालिटी इंडेक्स मंगळवारी १०१ होता. त्यामुळे आपण हळूहळू धोक्याच्या पातळीकडे सरकतोय, हे विशेष.

कारणे काय?
बेसुमार वृक्षांची कत्तल करून तेथे टोलेजंग इमारती बांधण्याचा सपाटा सुरू आहे. शहराच्या आसपासची शेती आता प्लॉटिंगमध्ये बदलत आहे. नवीन वृक्षांची लागवड फार कमी होते. औद्योगिकीकरण झपाट्याने वाढत आहे. वाहनांची संख्याही अफाट झाली. पर्यावरणाचा समतोल दिवसेंदिवस ढासळत चालला आहे.

घराबाहेर पडताना मास्क लावा
कोरोनामुळे आपण मास्क वापरतच आहोत. नेहमीसाठीही आपण मास्कचा वापर केला तर काही बिघडत नाही. शहराची हवा अजून चांगली आहे. एवढी वाईट अवस्था शहराची नाही. घराबाहेर पडले तर हवेमुळे विविध आजार होतील, अशी परिस्थिती सुदैवाने नाही. मास्क वापरणे हाच पर्याय आहे.
- डॉ. अभय जैन, वैद्यकीय तज्ज्ञ.

हवेची गुणवत्ता कशी सुधारणार?
झाडे लावणे हा सर्वात उत्तम पर्याय आहे. प्रत्येक नागरिकाने आपल्या घरासमोर किमान एक तरी झाड लावले तर शहरातील हवेची गुणवत्ता कधीच खराब होणार नाही.
- रवी चौधरी, पर्यावरणप्रेमी

औद्योगिक वसाहतींमधील कारखान्यांनी शास्त्रोक्त पद्धतीने काम करायला हवे. वीटभट्ट्या, प्लास्टिक जाळणे, टायर जाळणे आदी प्रकार थांबवून सार्वजनिक वाहनांचा जास्त वापर करावा.
- जे. एम. भडके, पर्यावरणप्रेमी

प्रशासन काय करतंय?
महापालिका आणि स्मार्ट सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी भविष्यात काय करावे लागेल, यासाठी डीपीआर तयार करण्यात येतोय. मनपाकडून दरवर्षी किमान २५ हजारांपेक्षा जास्त झाडे लावण्यात येतात. ती जगावेत, म्हणून कसोशीने प्रयत्न होतात.
- विजय पाटील, उद्यान अधीक्षक, मनपा.

Web Title: Warning, Aurangabad's air quality at risk! Cement forest, industrialization, pollution increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.