विद्यापीठातील रोजंदारी कामगारांचा आंदोलनाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:05 AM2021-06-25T04:05:57+5:302021-06-25T04:05:57+5:30
यासंदर्भात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांची भेट घेतली असता रोजंदारी कामगारांसह सफाई कामगार आणि सुरक्षारक्षकांचे भविष्य निर्वाह निधीची रक्कम न ...
यासंदर्भात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांची भेट घेतली असता रोजंदारी कामगारांसह सफाई कामगार आणि सुरक्षारक्षकांचे भविष्य निर्वाह निधीची रक्कम न भरल्यामुळे वेतन थकविण्यात आल्याचे निदर्शनास आले. नियमानुसार रोजंदारी कामगारांचे प्रत्येक महिन्याचे वेतन अदा केल्यानंतर त्यांना किती वेतन देण्यात आले. त्यांचा पीएफ, इएसआयसीची रक्कम भरल्याबद्दल प्रत्येक महिन्याला तपासणी केल्यानंतरच दुसऱ्या महिन्यांचे वेतन अदा केली जाते. मात्र, आस्थापना आणि वित्तलेखा विभागातील अधिकार्यांनी प्रत्येक महिन्याला या रकमा भरल्याची शहानिशा न करताच कामगारांचे वेतन वितरित केले आहे. या दोन विभागाच्या अनागोंदी कारभारामुळे रोजंदारी कामगारांचा सन २०१० ते २०१२ या कार्यकाळात कपात करण्यात आलेला थकीत पीएफ अद्यापही कामगारांना मिळालेला नाही. त्यातच आता सन २०१२पासूनदेखील अनेक रोजंदारी कामगारांचा पीएफ भरलेला नाही.
रोजंदारी कामगारांसह सफाई कामगार आणि सुरक्षारक्षकांचे मे महिन्यातील थकीत वेतन तात्काळ देण्याबाबत संबंधित असलेल्या अधिकाऱ्यांना आदेश द्यावेत. अन्यथा २९ जूनपासून बेमुदत उपोषण करण्यात येईल, असा इशारा भीमशक्ती रोजंदारी कर्मचारी युनियनच्या वतीने देण्यात आला आहे.
यावेळी किरणराज पंडित, किशोर भिंगारे, भगवान निकाळजे, गौतम सोनवणे, दिलीप जाधव, विजय मुळे, ईश्वर काळे, राहुल गायकवाड, भाऊसाहेब बोडखे, मनोज भिंगारे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.