कचऱ्याची समस्या कायम

By Admin | Published: May 6, 2017 12:12 AM2017-05-06T00:12:06+5:302017-05-06T00:15:34+5:30

उस्मानाबाद : केंद्राने केलेल्या स्वच्छ शहरांच्या यादीत उस्मानाबादने २१९ वा क्रमांक पटकाविला आहे

Waste problem persists | कचऱ्याची समस्या कायम

कचऱ्याची समस्या कायम

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
उस्मानाबाद : केंद्राने केलेल्या स्वच्छ शहरांच्या यादीत उस्मानाबादने २१९ वा क्रमांक पटकाविला आहे. पालिकेच्या या यशाबद्दल कौतुक होत असले तरी शहरातील अनेक भागात आजही कचऱ्याचे ढिगारे जैसे थे असल्याने पुर्नार्थाने शहर स्वच्छ ठेवण्यासाठी पालिकेबरोबरच सर्वसामान्य नागरिकांनीही पुढाकार घेण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे.
देशातील स्वच्छ शहरांची यादी नुकतीच जाहीर झाली आहे. या यादीत २१९ वा क्रमांक पटकावित मराठवाड्यात नांदेडनंतर उस्मानाबादने बाजी मारली आहे. या यादीत मराठवाड्यातील परभणी शहर २२९ व्या, उदगीर २४०, औरंगाबाद २९९, बीड ३०२, लातूर ३१८ तर जालना शहराचा क्रमांक १६८ असा आहे. मराठवाड्यातील इतर शहरांच्या तुलनेत उस्मानाबादने घेतलेली झेप कौतुकास्पद आहे. मात्र स्वच्छ शहराचा मिळालेला लौकीक कायम ठेवण्यासाठी आणखी परिश्रमाची आवश्यकता असल्याचेच शहराच्या विविध भागातील परिस्थिती सांगते.
शहरातील मध्यवर्ती असलेल्या समता नगर, आनंदनगर तसेच रामनगरमधीलही प्रमुख रस्त्याच्या कडेला अनेक नागरिक कचरा टाकत असल्याचे दिसून येते. या भागातील कचराकुंड्या पालिकेने काही दिवसापूर्वी काढून टाकल्या आहेत. कचराकुंड्याबरोबरच शेजारी नागरिक कचरा टाकत होते. त्यामुळेच कुंड्या काढल्यास घरातील कचरा नागरिक घरात साठवून घंटागाडीमध्ये देतील ही अपेक्षा होती. मात्र त्यानंतरही कचरा रस्त्यावर फेकला जात आहे. अशीच परिस्थिती जिल्हा स्टेडियम ते पालिका कार्यालय या मार्गावर असल्याचे दिसते. या परिसरातील अनेक व्यापारी रस्त्याच्या बाजूला कचरा फेकतात. विशेष म्हणजे नाट्यगृहाच्या प्रवेशद्वाराशेजारीही कचऱ्याचे ढीग दिसून येतात. गणेशनगर, खाजानगर या परिसरातील स्वच्छतेकडे अधिक लक्ष देण्याची आवश्यकता दिसून आली.

Web Title: Waste problem persists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.