औरंगाबाद मधील कचऱ्याची स्थिती नियंत्रणाबाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 12:04 AM2018-03-15T00:04:57+5:302018-03-15T00:05:03+5:30

शहरातील मुख्य रस्त्यांसह गल्लीबोळांमध्ये आजही हजारो मेट्रिक टन कचरा पडून आहे. हा कचरा कुठे नेऊन टाकावा हा सर्वात मोठा प्रश्न महापालिकेला भेडसावतो. जुन्या कचºयाची विल्हेवाट लागण्यापूर्वीच नवीन हजारो मेट्रिक टन कचरा रस्त्यांवरून ओसंडून वाहत आहे.

The waste situation in Aurangabad is out of control | औरंगाबाद मधील कचऱ्याची स्थिती नियंत्रणाबाहेर

औरंगाबाद मधील कचऱ्याची स्थिती नियंत्रणाबाहेर

googlenewsNext
ठळक मुद्दे४ झोन कार्यालये नापास : दुर्गंधी, धुरामुळे नागरिक आक्रमक

मुजीब देवणीकर । लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : शहरातील मुख्य रस्त्यांसह गल्लीबोळांमध्ये आजही हजारो मेट्रिक टन कचरा पडून आहे. हा कचरा कुठे नेऊन टाकावा हा सर्वात मोठा प्रश्न महापालिकेला भेडसावतो. जुन्या कचºयाची विल्हेवाट लागण्यापूर्वीच नवीन हजारो मेट्रिक टन कचरा रस्त्यांवरून ओसंडून वाहत आहे. चौकाचौकांत कचºयाला आग लावून देण्याच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झालेली आहे. महापालिका, महसूल, शासन नियुक्त अधिकारी अशी संपूर्ण यंत्रणा रस्त्यावर उतरलेली असतानाही परिस्थिती नियंत्रणात यायला तयार नाही. महापालिकेच्या झोन १ ते ३ आणि ९ मध्ये सर्वात वाईट अवस्था पाहायला मिळत असून, येथील ६० पेक्षा अधिक वॉर्डांमध्ये कचºयाचे वर्गीकरणच होत नसल्याची बाब समोर आली.
शहरातील कचराकोंडीला आज २६ दिवस पूर्ण होत आहेत. आणखी काही दिवस कचराकोंडी फुटण्याची कुठलीच शक्यताही नाही. हजारो मेट्रिक टन कचरा उचलण्यात आला. अज्ञात स्थळी नेऊन त्यावर प्रक्रिया करण्यात आली, असे चित्र मनपा आणि महसूल विभागाकडून दोन दिवसांपासून निर्माण करण्यात येत आहे. वस्तुस्थितीची माहिती घेण्यासाठी बुधवारी सकाळी मनपा पदाधिकारी व पत्रकारांनी
पाहणी दौºयाचे आयोजन केले होते. यावेळी महापौर नंदकुमार घोडेले, सभापती गजानन बारवाल, सभागृहनेता विकास जैन, अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग, घनकचराप्रमुख
विक्रम मांडुरके, शासन नियुक्त अधिकारी
उपस्थित होते.
मध्यवर्ती जकात नाका
सुका कचरा वेगळा करण्यासाठी मध्यवर्ती जकात नाक्यावर एका खाजगी कंपनीच्या मदतीने सेंटर उभारले आहे. येथील परिस्थिती नारेगावपेक्षाही भयानक होऊन बसली आहे. वेगवेगळ्या वॉर्डांचा मिक्स कचरा येथे आणून टाकण्यात येतोय. येथील दुर्गंधी एवढी भयंकर आहे की, नवीन व्यक्तीला उलट्या होतील, अशाही परिस्थितीत मध्यरात्री मनपाचेच कर्मचारी वेगवेगळ्या वॉर्डांमधील कचरा गुपचूप येथे आणून टाकत आहेत. कचºयावर लाखोंच्या संख्येने माशा घोंगावताना दिसून येत आहेत. याच माशा उद्या रोगराईला कारणीभूत ठरणार हे निश्चित. ओला कचरा वॉर्डातच जिरवावा आणि सुका कचरा येथे आणून टाकावा या उद्देशाला मनपा कर्मचाºयांनी हरताळ फासले.
रामनगर-मुकुंदवाडी
सिडको एन-१, रामनगर, मुकुंदवाडी या भागातील अनेक वॉर्डांमध्ये मागील काही वर्षांपासून ओल्या कचºयावर यशस्वीपणे प्रक्रिया करण्यात येते. ऐन कचरा कोंडीत जुना प्रयोग या भागातील नागरिकांना दिलासा देणारा आहे. रामनगर येथे महापालिकेच्या जागेत ओल्या कचºयावर शंभर टक्के प्रक्रिया करण्यात येत असल्याचे दिसून आले. महापालिकेचे कर्मचारी नियमितपणे प्रत्येक गल्लीत जाऊन ओला व सुका कचरा जमा करीत होते. कोणत्याच चौकात कचºयाचे डोंगर दिसून आले नाहीत.
औरंगपुरा भाजीमंडई
शहराच्या कोणत्याही भागात राहणारा व्यक्ती, देशी पर्यटक गुलमंडी, औरंगपुरा भागात अवश्य भेट देतात. भाजीमंडईच्या मुख्य चौकातच कचराच कचरा साचलेला होता. हे दृश्य पाहून मनपा पदाधिकारी जाम भडकले. युद्धपातळीवर कचराकुंडी बाजूला करण्याचे आदेश दिले. साचलेला ओला कचरा वेगळा करून प्रक्रिया केंद्रावर पाठविण्याच्या सूचना देण्यात आल्या.
शहागंज भाजीमंडई
भाजीमंडईत आसपासच्या नागरिकांसह पालेभाज्यांचा ढिगार लागला होता. येथेच शास्त्रीय पद्धतीने कंपोस्ट खत निर्मिती केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्रात विविध ओला कचरा टाकण्यात आला होता. यातून अजिबात दुर्गंधी येत नव्हती हे विशेष. हीच पद्धत ठिकठिकाणी राबविण्यात यावी, अशी सूचना शासन नियुक्त अधिकाºयांनी केली.

Web Title: The waste situation in Aurangabad is out of control

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.