वाहतूक पोलिसांवरच नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 12:28 AM2017-11-29T00:28:50+5:302017-11-29T00:29:07+5:30

बापू सोळुंके । लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : नियम मोडणा-या वाहनचालकांकडून आॅन दी स्पॉट दंड घेणे वाहतूक शाखेने बंद ...

Watch the traffic police | वाहतूक पोलिसांवरच नजर

वाहतूक पोलिसांवरच नजर

googlenewsNext

बापू सोळुंके ।
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : नियम मोडणा-या वाहनचालकांकडून आॅन दी स्पॉट दंड घेणे वाहतूक शाखेने बंद केले. असे असले तरी नियम मोडणा-यांकडून चिरीमिरी घेऊन त्यांना सोडून देणा-या वाहतूक पोलिसांवर सेफ सिटी प्रकल्पाच्या सीसीटीव्ही कॅमे-यांद्वारे वरिष्ठांनी नजर ठेवणे सुरू केले. जे पोलीस वाहनचालकांशी आर्थिक व्यवहार करताना कॅमे-यात कैद होतील, त्यांना कारवाईला सामोरे जावे लागेल.
याविषयी अधिक माहिती अशी की, शहरातील वाहनचालकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रस्त्यावर धावणा-या वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे पालन केले तर अपघाताचा धोका टळतो. असे असले तरी शहरातील हजारो वाहनचालक रोज वाहतूक नियम मोडून वाहने पळविताना दिसतात. नियम मोडणा-या वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी चौका-चौकात वाहतूक पोलीस तैनात असतात.
सहा महिन्यांपूर्वीपर्यंत शहरातील प्रत्येक वाहतूक पोलिसाकडे दंड आकारणीचे पावती पुस्तक देण्यात आले होते; परंतु वाहतूक पोलिसांनी जागेवर वसूल केलेला दंड शासनाच्या तिजोरीत जमा होतो, अथवा नाही, याबाबत वाहनचालक शंका उपस्थित करीत असे. दंड वसुलीत पारदर्शकता आणण्यासाठी शहर पोलिसांनी रस्त्यावरील वाहतूक पोलिसांकडून पावती पुस्तक काढून घेतले आणि त्यांच्या हातात केवळ चलन पुस्तिका दिली. नियम मोडणा-या वाहनचालकांना त्यांनी नियम तोडलेली कलमे नमूद करून त्यांच्या हातात चलन देणे एवढेच काम आता त्यांना देण्यात आले. वाहतूक पोलिसांकडून चलन मिळताच वाहतूक शाखा कार्यालयात जाऊन तेथील पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिका-यांकडे चलन जमा करून दंड भरणे ही पद्धत सुरू करण्यात आली. असे असताना चौका-चौकात उभे राहणारे वाहतूक पोलीस मात्र वाहनचालकांकडून पैसे घेऊन त्यांना सोडून देतात, अशा तक्रारी वरिष्ठ अधिका-यांना प्राप्त झाल्या.
या तक्रारींची शहानिशा करण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिका-यांनी आता सेफ सिटी प्रकल्पाच्या सीसीटीव्ही कॅ मेºयांची मदत घेण्याचे ठरविले. सूत्रांनी सांगितले की, वाहनचालकांशी रोख रकमेची देवाण-घेवाण करताना एकही कर्मचारी आढळला, तर त्यांच्याविरोधात कडक कारवाई केली जाणार आहे. यासाठी वाहतूक विभागाने सेफ सिटी प्रकल्पातील सीसीटीव्ही फुटेजची नियमित पाहणी करण्याचा निर्णय घेतला.

Web Title: Watch the traffic police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.