१५ दिवसांपासून मिळेना पाणी

By Admin | Published: August 28, 2016 12:04 AM2016-08-28T00:04:14+5:302016-08-28T00:19:25+5:30

व्यंकटेश वैष्णव , बीड शहरातील विविध भागात मागील १५ दिवसांपासून नळाला पाणी आलेले नाही. यामुळे पावसाळ्यात टंचाईला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे

Water for 15 days | १५ दिवसांपासून मिळेना पाणी

१५ दिवसांपासून मिळेना पाणी

googlenewsNext

व्यंकटेश वैष्णव , बीड
शहरातील विविध भागात मागील १५ दिवसांपासून नळाला पाणी आलेले नाही. यामुळे पावसाळ्यात टंचाईला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. या प्रकारामुळे नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
शहराला एकावेळी पाणीपुरवठा करण्यासाठी २४ एम.एल.डी. पाण्याची आवश्यकता आहे. शहराच्या पिण्याच्या पाण्याची मदार सध्या माजलगाव बॅक वॉटरवर आहे. येथून येणाऱ्या जलवाहिनीला सतत काही ना काही अडचणी येतात. परिणामी, शहरातील विविध भागात १५-१५ दिवस पाणी येत नाही. यामध्ये स्वराज्यनगर, बालेपीर, एकनाथनगर यांसह हद्दवाढीत असलेल्या परिसराचा समावेश आहे.
वेळेवर पाणी येत नसल्याने भर पावसाळ्यात नागरिकांना पाणी विकत घ्यावे लागत आहे. याबाबत नागरिकांनी वेळोवेळी पालिकेकडे तक्रारी केलेल्या आहेत. मात्र, नियोजनाचा अभाव होत असल्याने नळाला पाणी येण्यासाठी विलंब होत असल्याचेही समोर येत आहे.
शहराला पाणीपुरवठा दोन ठिकाणाहून करण्याची व्यवस्था आहे. यामध्ये बिंदूसरा प्रकल्प अद्यापही कोरडाठाक आहे. माजलगाव बॅक वॉटर बीडपासून ६० ते ७० किलोमीटरवर आहे. जलवाहिनीद्वारे पाणी आणले जाते. यासाठी इलेक्ट्रीसिटीची कमतरता भासत असल्याने देखील पाणी आणण्यास अडथळा निर्माण होत असल्याचे पालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. अनेक वेळा कमी क्षमतेने विद्युत पुरवठा होत असल्याने पाणी उपसा करणारे पंप चालत नाहीत. परिणामी, ठरलेल्या वेळेपेक्षा दोन ते तीन दिवस विलंबाने पाणीपुरवठा केला जातो.

Web Title: Water for 15 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.