‘जॅकवेल’मध्ये पाणीच पाणी; १० मोटारीने २४ तास उपसा, रोज लागते २ हजार लिटर डिझेल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2024 12:48 PM2024-09-28T12:48:28+5:302024-09-28T12:50:10+5:30

जायकवाडी धरणाच्या मध्यभागी नवीन पाणीपुरवठा योजनेचे जॅकवेल उभारण्यात येत आहे.

water all over in new pipeline's 'Jackwell' of Jayakwadi Dam; 24 hours of pumping by 10 cars, 2000 liters of diesel is required every day | ‘जॅकवेल’मध्ये पाणीच पाणी; १० मोटारीने २४ तास उपसा, रोज लागते २ हजार लिटर डिझेल

‘जॅकवेल’मध्ये पाणीच पाणी; १० मोटारीने २४ तास उपसा, रोज लागते २ हजार लिटर डिझेल

छत्रपती संभाजीनगर: जायकवाडी धरण शंभर टक्के भरले आहे. दरम्यान, धरणाच्या मध्यभागी नवीन पाणीपुरवठा योजनेचे जॅकवेल उभारण्यात येत आहे. जॅकवेलमध्ये पाणी येऊ नये म्हणून मागील वर्षीच चारही बाजूने जीव्हीपीआर कंपनीकडून कॉफरडॅम (सिमेंटचे आवरण) तयार करून घेतले. त्यानंतरही जॅकवेलमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी येत आहे. 

मागील पंधरा दिवसांपासून जॅकवेलच्या काँक्रिटीकरणाचे काम बंद होते. जॅकवेलमध्ये आलेले पाणी उपसण्यासाठी ७५ एचपीच्या तब्बल १० मोटारी २४ तास सुरू आहेत. दररोज दोन हजार लिटर डिझेल पाणी काढण्यासाठी लागत आहे. जॅकवेल १०० मीटर लांब, ३४ मीटर रुंद आहे. खोली १९ मीटर आहे. महाराष्ट्रात एवढ्या खोलीपर्यंत एकही जॅकवेल आजपर्यंत बांधण्यात आला नसल्याचा दावा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा आहे.

जॅकवेलचे वैशिष्ट्य म्हणजे १९२ कॉलम आहेत. प्रत्येक चार मीटरवर एक दीड मीटर आकाराचा कॉलम असून, त्यामध्ये ३२ एमएमच्या लाेखंडाचा वापर होतोय. पुढील १०० वर्षे तरी धरणातील या जॅकवेलला धोका राहणार नाही. सध्या क्रेनच्या साह्याने गुरुवारपासून काँक्रिटीकरण सुरू आहे.

Web Title: water all over in new pipeline's 'Jackwell' of Jayakwadi Dam; 24 hours of pumping by 10 cars, 2000 liters of diesel is required every day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.