निम्न तेरणाच्या पंपात बिघाड झाल्याने पाणी बंद

By Admin | Published: July 22, 2016 12:29 AM2016-07-22T00:29:33+5:302016-07-22T00:39:31+5:30

लातूर : बेलकुंड येथे पाणीपुरवठा करणाऱ्या निम्न तेरणा प्रकल्पातील जॅकवेलवरील पंपात बिघाड झाल्याने गुरुवारी दिवसभर लातुरात एकही टँकर पाणी आले नाही.

Water clogged due to failure of low pine pumps | निम्न तेरणाच्या पंपात बिघाड झाल्याने पाणी बंद

निम्न तेरणाच्या पंपात बिघाड झाल्याने पाणी बंद

googlenewsNext


लातूर : बेलकुंड येथे पाणीपुरवठा करणाऱ्या निम्न तेरणा प्रकल्पातील जॅकवेलवरील पंपात बिघाड झाल्याने गुरुवारी दिवसभर लातुरात एकही टँकर पाणी आले नाही. त्यामुळे शुक्रवारी लातूर शहरात होणारा पाणीपुरवठा मनपाकडून एक दिवसासाठी बंद राहणार आहे.
सध्या रेल्वे व्यतिरिक्त बेलकुंड व डोंगरगाव येथून १०० टँकरद्वारे दररोज जवळपास ३५ ते ४० लाख लिटर पाणी आणले जाते. निम्न तेरणावरील पंपात बुधवारी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास बिघाड झाला. गुरुवारी सकाळी ६ वाजेपासून दुरुस्तीचे काम सुरू होते. सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास काम पूर्ण झाले असल्याचे पाणीपुरवठा अभियंता कलवले यांनी सांगितले. रात्री टँकर सुरू झाले असले तरी वाटपासाठी लागणारे उपलब्ध पाणी कमी असल्याने मनपाने शुक्रवारी पाणीपुरवठा बंद ठेवला असल्याचे उपायुक्त संभाजी वाघमारे यांनी सांगितले. नागरिकांनी एक दिवस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.(प्रतिनिधी)

Web Title: Water clogged due to failure of low pine pumps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.