मराठवाड्यातील ७६ शहरांवर जलसंकट; पाऊस न पडल्यास पिण्याच्या पाण्याचे होणार वांधे

By विकास राऊत | Published: August 10, 2023 02:31 PM2023-08-10T14:31:12+5:302023-08-10T14:32:25+5:30

बहुतांश शहरात एक ते सहा महिनेच पुरेल एवढा जलसाठा

Water crisis in 76 cities of Marathwada; If there is no rain, there will be scarcity of drinking water | मराठवाड्यातील ७६ शहरांवर जलसंकट; पाऊस न पडल्यास पिण्याच्या पाण्याचे होणार वांधे

मराठवाड्यातील ७६ शहरांवर जलसंकट; पाऊस न पडल्यास पिण्याच्या पाण्याचे होणार वांधे

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात पावसाने दडी मारल्यामुळे ७६ शहरांवर पिण्याच्या पाण्याचे मोठे संकट आले आहे. विभागीय प्रशासनाने याबाबत चाचपणी केली असून, शासनाला याबाबतची माहिती अहवालानुसार कळविली आहे. बहुतांश शहरांना एक ते सहा महिने पुरेल एवढाच जलसाठा सध्या प्रकल्पात आहे. उर्वरित पावसाळ्यात समाधानकारक पाऊस न झाल्यास मराठवाड्यातील तालुक्यातून स्थलांतर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ५ तालुक्यांना ऑगस्ट २०२३ अखेरपर्यंत पिण्याचे पाणी उपलब्ध आहे.

६ तालुक्यांना सप्टेंबर अखेरपर्यंत, ९ तालुक्यांना ऑक्टोबरपर्यंत पाणी पुरेल एवढा साठा लगतच्या प्रकल्पांमध्ये आहे. ५ तालुक्यांना नोव्हेंबर २०२३ अखेरपर्यंत, ३६ तालुक्यांना डिसेंबर २०२३ अखेरपर्यंत पिण्याचे पाणी देणे शक्य होईल. उर्वरित १५ पैकी १० तालुक्यांना जानेवारी २०२४, मार्च २०२४ पर्यंत तर ५ तालुक्यांना वर्षभर पाणीपुरवठा होईल, एवढा साठा प्रकल्पात आहे.

१ कोटी लोकांची तहान कशी भागणार?
२०११च्या जनगणनेनुसार मराठवाड्याची लोकसंख्या १ कोटी ८७ लाख असून, यातील सुमारे ७६ लाख लोकसंख्या शहरी भागात २०११ नुसार आहे. जनगणना अजून झालेली नसून लोकसंख्या २ कोटींच्या पुढे गेल्याचा अंदाज असून, शहरी लोकसंख्येचा टक्का ५० टक्के असणे शक्य आहे. यानुसार पाऊस न पडल्यास सुमारे १ कोटींहून अधिक लोकसंख्येच्या पिण्याच्या प्रश्न गंभीर होऊ शकतो.

मराठवाड्यात किती पाऊस झाला?
मराठवाड्यात ६८ दिवसांत केवळ ४९ टक्के पाऊस झाला. गतवर्षी ८० टक्के पाऊस झाला होता. नांदेडमधील काही तालुके वगळता समाधानकारक पाऊस नाही. मोठ्या ११ जलप्रकल्पांसह मध्यम व लघु ८६६ प्रकल्प, बंधाऱ्यांवर अवलंबून शहर, गावांना पाणीटंचाईची भीती आहे.

मराठवाड्यातील जिल्हानिहाय शहरे.......किती दिवस पाणी पुरणार?
औरंगाबाद जिल्हा

औरंगाबाद शहर.........वर्षभर पुरेल
वैजापूर..........सप्टेंबर २०२३
सिल्लोड------ऑगस्ट २०२३
पैठण---------नोव्हेंबर २०२३
कन्नड--------३१ ऑगस्ट २०२३
गंगापूर..............३१ ऑगस्ट २०२३
खुलताबाद..........नोव्हेंबर २०२३
फुलंब्री..............सप्टेंबर २०२३
सोयगाव..............३१ ऑगस्ट २०२३

जालना जिल्हा
जालना शहर..........वर्षभर पुरेल
अंबड.................वर्षभर पुरेल
परतूर................डिसेंबर २०२३
भोकरदन...........१५ दिवस पुरेल
बदनापूर.............ऑगस्ट २०२३
घनसावंगी..........ऑक्टो.२०२३
जाफ्राबाद............ऑक्टो.२०२३
मंठा.................डिसेंबर २०२३
तीर्थपुरी............डिसेंबर २०२३

परभणी जिल्हा...................
मानवत..........डिसेंबर २०२३
पाथरी.............डिसेंबर २०२३
सेलू..............डिसेंबर २०२३
पालम............डिसेंबर २०२३
पूर्णा..................सप्टेंबर २०२३
सोनपेठ.............डिसेंबर २०२३

जिंतूर..................डिसेंबर २०२३
गंगाखेड..............डिसेंबर २०२३

हिंगोली जिल्हा...............
हिंगोली...............डिसेंबर २०२३
वसमत.............डिसेंबर २०२३
कळमनुरी.............डिसेंबर २०२३
औंढा नागनाथ...........डिसेंबर २०२३
सेनगाव................डिसेंबर २०२३

नांदेड जिल्हा..................
कंधार....................३१ मार्च २०२४
कुंडलवाडी............नोव्हेंबर २०२३
किनवट.............जून २०२४
देगलूर...............मार्च २०२४
धर्माबाद..............सप्टेंबर २०२३
बिलोली..................जून २०२४
लोहा...............डिसेंबर २०२३
उमरी................मार्च २०२४
हदगाव.............ऑक्टोबर २०२३
भोकर............ऑक्टोबर २०२३
मुखेड................डिसेंबर २०२३
मुदखेड............सप्टेंबर २०२३
अर्धापूर............जून २०२४
माहूर..................जून २०२४
हिमायतबाग..........डिसेंबर २०२३
नायगाव...............डिसेंबर २०२३

बीड जिल्हा............................
बीड....................डिसेंबर २०२३
अंबाजोगाई...........ऑक्टोबर २०२३
परळी.................. ऑक्टोबर २०२३
गेवराई.................. ऑक्टोबर २०२३
माजलगाव...............डिसेंबर २०२३
धारूर..................डिसेंबर २०२३
केज................जानेवारी २०२४
आष्टी.............डिसेंबर २०२३
पाटोदा...............ऑक्टोबर २०२३
शिरूर कासार............ ऑक्टोबर २०२३
वडवणी..............डिसेंबर २०२३

लातूर जिल्हा........................
उदगीर.......................वर्षभर पुरेल
अहमदपूर...................डिसेंबर २०२३
निलंगा.......................वर्षभर पुरेल
औसा......................डिसेंबर २०२३
चाकूर....................डिसेंबर २०२३
शिरूर अनंतपाळ..........नोव्हेंबर २०२३
देवणी.......................नोव्हेंबर २०२३
जळकोट...............वर्षभर पुरेल
रेणापूर.................नोव्हेंबर २०२३

धाराशिव जिल्हा.............
धाराशिव..................डिसेंबर २०२३
तुळजापूर.................डिसेंबर २०२४
नळदुर्ग...................डिसेंबर २०२३
उमरगा................डिसेंबर २०२३
मुरुम...................डिसेंबर २०२३
कळंब................डिसेंबर २०२३
भूम...................डिसेंबर २०२३
परंडा.................डिसेंबर २०२३
वाशी....................डिसेंबर २०२३
लोहारा...............सप्टेंबर २०२३

Web Title: Water crisis in 76 cities of Marathwada; If there is no rain, there will be scarcity of drinking water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.