पाणचक्कीची नहरच फोडली

By Admin | Published: April 23, 2016 11:59 PM2016-04-23T23:59:44+5:302016-04-24T00:17:50+5:30

मुजीब देवणीकर, औरंगाबाद विभागीय आयुक्त, मनपा आयुक्तांनी प्रयत्न सुरू केलेले असतानाच हिमायत बागेच्या पाठीमागे जलाल कॉलनीत मनपानेच नहर-ए-अंबरी फोडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला

Water cut off the watercourse | पाणचक्कीची नहरच फोडली

पाणचक्कीची नहरच फोडली

googlenewsNext

मुजीब देवणीकर, औरंगाबाद
नहर-ए-पाणचक्की, नहर-ए-अंबरीला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी विभागीय आयुक्त, मनपा आयुक्तांनी प्रयत्न सुरू केलेले असतानाच हिमायत बागेच्या पाठीमागे जलाल कॉलनीत मनपानेच नहर-ए-अंबरी फोडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. महापालिकेच्या या कृत्यामुळे इतिहासप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. दोषींवर ऐतिहासिक वारशाची मोडतोड केल्याचा गुन्हा नोंदवावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
महापालिका आणि पुरातत्व विभागाच्या बोटचेपे धोरणामुळे आजपर्यंत
डागडुजी करावी
एकीकडे नहरींचे जतन करण्यासाठी मनपाकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. दुसरीकडे मनपा प्रशासनच नहर फोडत असेल तर हा प्रकार अत्यंत गंभीर आहे. महापालिकेने त्वरित मोडतोड झालेल्या नहरीची डागडुजी करून वाया जाणारे पाणी बंद केले पाहिजे. असे न केल्यास पावसाळा सुरू झाल्यावर ऐतिहासिक पाणचक्कीत एक थेंबही पाणी जाणार नाही. मागील अनेक वर्षांपासून आपण नहरींच्या पुनर्वसनासाठी लढा देत आहोत. शासन यासाठी अजिबात गंभीर नाही. न्यायालयाच्या आदेशाची दखल घेतली जात नाही.
-रमजान शेख, इतिहास तज्ज्ञ

Web Title: Water cut off the watercourse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.