धरणातून पाण्याचा विसर्ग

By Admin | Published: August 11, 2015 12:06 AM2015-08-11T00:06:54+5:302015-08-11T00:06:54+5:30

जळगाव जामोद तालुक्यातील धानोरा धरणाचे गेट नादुरुस्त.

Water from the dam | धरणातून पाण्याचा विसर्ग

धरणातून पाण्याचा विसर्ग

googlenewsNext

जळगाव जामोद (जि. बुलडाणा): ग्राम धानोरा आणि सुलज या दोन गावांना पाणी पुरवठा करणार्‍या धानोरा धरणाचे गेट नादुरूस्त असल्याने गेल्या १0 दिवसापासून धरणातील पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. त्यामुळे पाण्याचा नाहक अपव्यय होत असून यामुळे भविष्यात धानोरा व परिसरातील शेतकर्‍यांच्या सिंचनासाठी पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची भीती आहे. सातपुड्याच्या पायथ्याशी धानोरा धरण असून या धरणामुळे अंदाजे २0 हेक्टर जमीनीला सिंचनाची व्यवस्था होवून बाजुच्या गावांना पाणी पुरवठा होतो. त्यामुळे या परिसरातील शेतकरी या धरणाच्या पाण्यावर अवलंबुन असतात. अशा परिस्थितीत केवळ धरणाचे पाणी सोडण्याचे गेट बिघडले असून संबंधित लघु पाटबंधारे विभागाचे या गोष्टीकडे दुर्लक्ष दिसते. उन्हाळ्यात या गेट दुरूस्तीसाठी एका एजन्सीला काम दिल्या गेले. मात्र तरीही ते दुरूस्त झाले नाही. उलट भर उन्हाळ्यात में महिन्यात सदर दरवाजा तोडण्यात आला. त्यामुळे तब्बल आठ दिवस धरणातील सर्व पाणी वाहून गेले. त्यामुळे धानोरा आणि सुलजमध्ये पाणीटंचाईचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यानंतर पावसाळ्यापुर्वी सदर गेट पुर्ववत दुरूस्त करणे आवश्यक असतानाही ती कार्यवाही सदर यंत्रणेकडून गेल्या गेली नाही. त्याचा परिणाम म्हणजे परिसरात गेल्या आठवड्यात भरपूर पाऊस झाला आणि धरणे तुडुंब भरली हे धरणातही भरपूर पाणीसाठा चोही बाजुने आला. परंतु गेट नादुरूस्त असल्याने पाणी वाहून जात आहे. त्यामुळे धानोरा वासियांमध्ये संबंधित यंत्रणेबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे.

Web Title: Water from the dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.