जायकवाडी धरणातून पाणी सोडणार

By Admin | Published: May 16, 2014 12:29 AM2014-05-16T00:29:02+5:302014-05-16T00:40:11+5:30

पैठण : तालुक्यात निर्माण झालेल्या अभूतपूर्व पाणीटंचाईवर मात करण्यासाठी डाव्या कालव्या वरील सीआर गेट बंद करून जायकवाडी धरणातून पाणी सोडण्यात येणार आहे.

Water from the dam in the Jayakwadi dam | जायकवाडी धरणातून पाणी सोडणार

जायकवाडी धरणातून पाणी सोडणार

googlenewsNext

पैठण : तालुक्यात निर्माण झालेल्या अभूतपूर्व पाणीटंचाईवर मात करण्यासाठी डाव्या कालव्या वरील सीआर गेट बंद करून जायकवाडी धरणातून पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती महाराष्टÑ राज्य धरणग्रस्त कृती समितीचे अध्यक्ष काकासाहेब भुकेले पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेऊन दिली. याबाबत धरणग्रस्त कृती समितीच्या वतीने गेल्या महिनाभरापासून पालकमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री, जलसंपदामंत्री, अधीक्षक अभियंता व प्रशासक लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, जिल्हा प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून पाणीटंचाईचे भीषण वास्तव मांडले आहे. पैठण तालुक्यात सध्या भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून नागरिक व जनावरांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने तालुक्यात ३५ टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे, असे काकासाहेब भुकेले यांनी सांगितले. धरणग्रस्तांची दुर्दशा जायकवाडी धरणासाठी घरदार व सुपीक जमिनीवर पाणी सोडून त्याग केलेल्या धरणग्रस्तांच्या पदरी मोठी निराशा आली आहे. धरणग्रस्तांच्या जमिनीच्या मोबदल्यात त्यांना जायकवाडीच्या लाभक्षेत्रात १२ महिने सिंचनाची हमी देत जमिनी देण्यात आलेल्या आहेत. धरणग्रस्तांनी या जमिनीत पाणी आणण्यासाठी डाव्या व उजव्या कालव्यावरून ४ ते ५ किलोमीटर अंतरापर्यंत पाईपलाईन टाकल्या व त्या आधारे जमिनीवर फळबागा, ऊस अशी पिके घेतली आहेत; मात्र कालव्यात पाणी नसल्यामुळे पिण्यासाठीच पाणी मिळेना तिथे पिकांना कोठून पाणी देणार अशी अवस्था शेतकर्‍यांची निर्माण झाली आहे. या क्षेत्रातील पिके आठवडाभर जगतील असे चित्र निर्माण झाले आहे. सीआर गेट दाबून पाणी सोडा डाव्या कालव्यावरील गोपेवाडी व विहामांडवा येथील सीआर गेट (काट दरवाजे) (क्रॉस रेग्युलर गेट) बंद करून धरणातून पाणी सोडल्यास कालव्यात पाणीसाठा होऊन ४२ गावांचा पिण्याच्या पाण्याचा व सिंचनाचा प्रश्न मार्गी लागू शकतो व या भागात सुरू असलेल्या टँकरचा खर्च वाचू शकतो. यामुळे तातडीने या कालव्यात पाणी सोडावे, अशी मागणी या भागातील धरणग्रस्तांसह नागरिकांनी केली आहे. २६ रोजी गेट बंद आंदोलन जायकवाडी प्रशासनाने दि. २२ रोजी कालव्यात पाणी सोडण्याचे आश्वासन दिले आहे, असे असले तरी प्रशासन याबाबत चालढकल करीत असल्याचे दिसून येत आहे. दि. २२ रोजी पाणी न सोडल्यास दि. २६ रोजी हजारो शेतकर्‍यांसह जाऊन जायकवाडी येथील कार्यकारी अभियंता कार्यालयास कुलूप ठोकण्याचा इशारा काकासाहेब भुकेले यांनी दिला आहे. (वार्ताहर) या गावांना होईल फायदा सीआर गेट दाबून कालव्यात पाणी अडविल्यास, कातपूर, नारायणगाव, मुधलवाडी, पैठण, आखतवाडा, करंजखेडा, सोलनापूर, रहाटगाव, पंथेवाडी, वाघाडी, वडवाळी, गोपेवाडी, ज्ञानेश्वरवाडी, माळवाडी, सायगाव, आपेगाव, आगर नांदर, डेरा, इंदेगाव, ब्रह्मगाव, हिंगणे, विहामांडवा, चिंचाळा, नवगाव, तुळजापूर, रामनगर, आवडे उंचेगाव, घेवरी टाकळी, अंबड, हिरडपुरी अशी डाव्या कालव्यावरील ३१ गावे व उजव्या कालव्यावरील सोनवाडी, तांदूळवाडी, जायकवाडी, तेलवाडी, चनकवाडी, दादेगाव जहांगीर, दादेगाव चांगतपुरी, सायगाव, खडका, मडका अशा ४९ गावांचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघू शकतो.

Web Title: Water from the dam in the Jayakwadi dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.