पाणी वितरणाचा तपशील मनपाच्या वेबसाईटवर

By Admin | Published: May 5, 2016 12:14 AM2016-05-05T00:14:31+5:302016-05-05T00:21:52+5:30

लातूर : लातूर शहरात दररोज पाणी वितरीत करण्यात आलेल्या व दुसऱ्या दिवशी करण्यात येणाऱ्या पाण्याचा प्रभागनिहाय तपशील महापालिकेच्या वेबसाईटवर दररोज प्रकाशित केला जात आहे.

Water distribution details on the MMC's website | पाणी वितरणाचा तपशील मनपाच्या वेबसाईटवर

पाणी वितरणाचा तपशील मनपाच्या वेबसाईटवर

googlenewsNext

लातूर : लातूर शहरात दररोज पाणी वितरीत करण्यात आलेल्या व दुसऱ्या दिवशी करण्यात येणाऱ्या पाण्याचा प्रभागनिहाय तपशील महापालिकेच्या वेबसाईटवर दररोज प्रकाशित केला जात आहे. १३५ टँकरच्या ६६ फेऱ्यांतून ४९.३४ लाख आणि गुरुत्व वाहिनीवरील स्टँड पोस्टवरून १० लाख लिटर पाणी नागरिकांना दररोज वितरीत केले जात आहे. दररोज एकूण ६० लाख लिटर्स पाणी वितरीत केले जात आहे.
लातूर शहराला दररोज २५ लाख लिटर्स पाणी रेल्वेने उपलब्ध होत असून, बेलकुंड व डोंगरगाव येथून टँकरर्सद्वारे सरासरी ३५ ते ४५ लाख लिटर्स पाणी उपलब्ध होत आहे. अशा प्रकारे सध्या शहरात दररोज सरासरी ६० ते ७० लाख लिटर्स पाणी संकलित केले जात आहे. या पाण्याच्या वितरणाचे काटेकोरपणे नियोजन मनपाने केले असल्याचे आयुक्त सुधाकर तेलंग यांनी सांगितले. १३५ टँकरच्या ६६६ फेऱ्यांद्वारे ४९.३४ लाख लिटर्स पाणी शहरातील प्रभागांमध्ये वितरीत केले जात आहे. तसेच शहरातील पाच जलकुंभ, हरंगुळ जलशुद्धीकरण केंद्र, मुख्य गुरुत्व वाहिनीवरील स्टँड पोस्ट वाहिनीवरून दहा लाख लिटर्स पाण्याचे वितरण केले जात आहे.
पारदर्शकरित्या पाणीपुरवठा करण्यासाठी मनपाकडून प्रयत्न सुरू आहेत. शहरातील गांधी चौक, नांदेड नाका, सरस्वती कॉलनी, आर्वी टाकी तसेच हरंगुळ जलशुद्धीकरण केंद्र येथे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून, शहरांतर्गत व शहराबाहेरुन पाणी आणणाऱ्या सर्व टँकर्सना जीपीएस प्रणाली बसविण्यात आली आहे. त्याची लिंक महानगरपालिकेच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच शहरात दररोज करण्यात आलेल्या व दुसऱ्या दिवशी करण्यात येणाऱ्या प्रत्येक प्रभागाचा पाणी वितरणाचा तपशीलही महानगरपालिकेच्या वेबसाईटवर दररोज प्रकाशित केला जात आहे, असेही मनपा आयुक्त सुधाकर तेलंग यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
२४ तास नियंत्रण कक्ष : तक्रार असेल तर टोलफ्रीवर संपर्क साधा
पारदर्शकपणे पाण्याचे वितरण करण्यासाठी मनपाने उपाययोजना व नियोजन केले आहे. शिवाय, नागरिकांच्या काही तक्रारी आल्यास २४ तास नियंत्रण कक्ष कार्यान्वित केला आहे. पाण्याबाबत काही तक्रारी असतील तर नागरिकांनी थेट नियंत्रण कक्षाचा १८००२३३१३८०८ व ०२३८२-२५५५८५ या क्रमांकावर संपर्क साधावा. आलेल्या तक्रारींची दखल तात्काळ घेऊन नियोजन केले जाईल, असे महानगरपालिका प्रशासनाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

Web Title: Water distribution details on the MMC's website

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.