पाणी- पुरी मशीनमध्ये पडून तरुणाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2019 11:30 PM2019-04-29T23:30:34+5:302019-04-29T23:30:57+5:30
पाणी-पुरी तयार करण्याच्या मशीनमध्ये पडून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना २९ एप्रिल रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास हडकोतील स्वामी विवेकानंदनगर येथे घडली. याप्रकरणी सिडको ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
औरंगाबाद : पाणी-पुरी तयार करण्याच्या मशीनमध्ये पडून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना २९ एप्रिल रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास हडकोतील स्वामी विवेकानंदनगर येथे घडली. याप्रकरणी सिडको ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
कुलदीप रामसिंग कुशवाह (२६, रा. स्वामी विवेकानंदनगर, हडको एन-१२) असे मृताचे नाव आहे. पहाटे चार वाजेच्या सुमारास कुलदीप पाणी-पुरी तयार करण्याच्या मशीनमध्ये पडून बेशुद्ध झाला. यानंतर त्याला तातडीने घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. घाटीतील अपघात विभागात उपचार सुरू असताना कुलदीपचा सकाळी ६.२० वाजता मृत्यू झाला.
जळालेल्या वृद्ध महिलेचा मृत्यू
औरंगाबाद : गारखेडा परिसरातील छत्रपतीनगर येथे देवासमोरील दिव्यामुळे अंगावरील गाऊनने पेट घेतल्याने जळालेल्या ८० वर्षीय वृद्ध महिलेचा उपचारादरम्यान घाटी रुग्णालयात २९ रोजी दुपारी मृत्यू झाला. याप्रकरणी पुंडलिकनगर ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
गंगाबाई किसनराव खुडे (८०) असे मृत महिलेचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, गंगाबाई या २६ रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास राहत्या घरी देव्हाऱ्यासमोरील दिव्यामुळे जळाल्या होत्या. यानंतर त्यांना घाटीत दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान आज त्यांचा अंत झाला. पुंडलिकनगर पोलीस या घटनेचा तपास करीत आहेत.
झाड तोडताना पडल्याने मृत्यू
औरंगाबाद : पीरबाजार परिसरातील झाड तोडत असताना घराच्या दुसºया मजल्यावरून पडून एक जणाचा मृत्यू झाला. ही घटना २९ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता घडली.
शेख अकबर शेख बाबू (३०