गिरिजा मध्यम प्रकल्पातून पाण्याची चोरी !

By Admin | Published: May 14, 2014 12:15 AM2014-05-14T00:15:22+5:302014-05-14T00:29:18+5:30

सुनील घोडके , खुलताबाद येसगाव येथील गिरिजा मध्यम प्रकल्पात अवैधरीत्या विद्युत मोटारी लावून, तसेच आकडे टाकून काही शेतकरी दररोज लाखो लिटर पाण्याची चोरी करीत आहेत.

Water from the Girija Medium Project! | गिरिजा मध्यम प्रकल्पातून पाण्याची चोरी !

गिरिजा मध्यम प्रकल्पातून पाण्याची चोरी !

googlenewsNext

सुनील घोडके , खुलताबाद खुलताबाद-फुलंब्री शहरासह २२ गावांना पाणीपुरवठा करणार्‍या येसगाव येथील गिरिजा मध्यम प्रकल्पात अवैधरीत्या विद्युत मोटारी लावून, तसेच आकडे टाकून काही शेतकरी दररोज लाखो लिटर पाण्याची चोरी करीत आहेत, याकडे जलसंपदा, तहसील प्रशासन, महावितरण कंपनी व खुलताबाद नगर परिषदेचे दुर्लक्ष होत आहे, तर मुबलक पाणी असूनही खुलताबादकरांना तीन दिवसांआड अत्यल्प पाणीपुरवठा होत असल्याने काही प्रमाणात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या वर्षी परतीच्या पावसाने गिरिजा प्रकल्पात बर्‍यापैकी पाणीसाठा झाला असून, मुबलक पाणी असूनही खुलताबाद नगर परिषद वर्षभरापासून जपून, काटकसरीने खुलताबादकरांना तीन दिवसांआड पाणीपुरवठा करीत आहे. महावितरण कंपनी विजेचे बिल न भरल्यास सर्वसामान्य माणसाची वीज खंडित करते. प्रकल्पात मात्र दिवसाढवळ्या विजेच्या खांबांवर आकडे टाकून विजेबरोबरच पाण्याचीही चोरी होत आहे, याबाबत महावितरण कंपनीस माहिती असूनही कारवाई केली जात नाही. गिरिजा प्रकल्पात पाण्याचा उपसा करण्यासाठी विद्युत मोटारी व पाईपलाईन टाकण्यात आली असून, याकडे सिंचन विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसते. प्रकल्पातून खुलताबाद शहरासाठी टाकण्यात आलेल्या पाईपलाईनमध्ये ठिकठिकाणी व्हॉल्व व पाईपमधून पाण्याची गळती होत असून, या ठिकाणी महिला कपडेही धूत आहेत. नगर परिषदेने पाण्याची होणारी गळती थांबवावी, अशी मागणी होत आहे. एकदिवसाआड पाणीपुरवठा करा शहराला पाणीपुरवठा करणार्‍या येसगाव गिरिजा मध्यम प्रकल्पात जवळपास ३५ टक्के पाणीसाठा शिल्लक असूनही नगर परिषद खुलताबादकरांना तीन दिवसाआड पाणीपुरवठा करते. प्रकल्पात मुबलक पाणी असूनही नगर परिषदेचे धोरण जनतेविरुद्ध असल्याचा आरोप होत आहे, तर दुसरीकडे शेतीसाठी पाण्याची चोरी होत असताना तहसील प्रशासन व नगर परिषद शांत असल्याने नागरिकांत संताप व्यक्त होत आहे. खुलताबादचे जलशुद्धीकरण केंद्रच अशुद्ध खुलताबाद येथे येणारे पाणी प्रथम जलशुद्धीकरण केंद्रात येऊन या ठिकाणी पाण्याचे शुद्धीकरण करण्यात येते; मात्र जलशुद्धीकरण केंद्रच अशुद्ध आहे. या केंद्राकडे नगर परिषदेचे दुर्लक्ष असल्याने येथील तुरटी विरघळविण्याची मशिनरी बंद असून, धरणातून येणार्‍या पाण्यातच तुरटी टाकली जाते. पाण्यावरच मोठ्या प्रमाणावर घाण व कचरा जमा होत आहे. जलशुद्धीकरण केंद्रावर कर्मचार्‍यांची संख्याही कमी असून, कधी कधी तुरटीऐवजी मीठ टाकून पाणी शुद्ध केले जाते. तसेच पाण्याच्या टाक्याही वेळोवेळी साफ केल्या जात नसल्याने खुलताबादकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मुख्याधिकारी असून ताप, नसून अडचण खुलताबाद नगर परिषदेच्या मुख्याधिकारी सविता हारकर या रुजू झाल्यापासून त्यांनी कधी शहरातील समस्या बघण्यासाठी फेरफटका मारला नाही. कार्यालयात बसूनच कारभार हाकत आहेत. त्यांचा कर्मचार्‍यांवर वचक नसल्याने शहरातील समस्येत वाढ झाली आहे. खुलताबादचे जलशुद्धीकरण केंद्रावर सुरू असलेला प्रकार हा त्याचे उत्तम उदाहरण होय. उन्हाळ्याचे दिवस असल्याने काळजी घेणे गरजेचे आहे.

Web Title: Water from the Girija Medium Project!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.