मांजरा धरणात चार सेंटिमीटरने पाणी वाढले; समाधानकारक साठ्यासाठी मोठ्या पावसाची गरज!

By हणमंत गायकवाड | Published: September 29, 2023 07:36 PM2023-09-29T19:36:15+5:302023-09-29T20:03:40+5:30

लातूर जिल्ह्यात सहा मिमी तर मांजरा प्रकल्प क्षेत्रात केवळ दहा मिलिमीटर पाऊस

Water in Manjra Dam rose by four centimeters; Need more rain! | मांजरा धरणात चार सेंटिमीटरने पाणी वाढले; समाधानकारक साठ्यासाठी मोठ्या पावसाची गरज!

मांजरा धरणात चार सेंटिमीटरने पाणी वाढले; समाधानकारक साठ्यासाठी मोठ्या पावसाची गरज!

googlenewsNext

लातूर : लातूर शहर व जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी आठ वाजेपर्यंत ६.०० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर मांजरा प्रकल्प क्षेत्रात दहा मिलिमीटर पाऊस पडला आहे. केज परिसरात पडलेल्या पावसामुळे केजडी नदीला पूर आला होता. मांजरा प्रकल्प क्षेत्रात आतापर्यंत ४८० मिलिमीटर पाऊस झाला आहे. दरम्यान, गुरुवारी झालेल्या पावसामुळे मांजरा प्रकल्पात ०.८ दलघमी नवीन पाणीसाठा झाला आहे. सद्यस्थितीत मांजरा धरणात २६.१० दहा टक्के जिवंत पाणीसाठा आहे. प्रकल्पात चांगला साठा होण्यासाठी मोठ्या पावसाची गरज आहे.

मांजरा प्रकल्पात थोडे वाढले पाणी.....
मांजरा प्रकल्प क्षेत्रात आतापर्यंत ४८० मिलिमीटर पाऊस पडला असून, यातून २० दलघमी नवीन पाणी यंदाच्या पावसाळ्यात आले आहे. सध्या धरणात ४६.१८६ दलघमी जिवंत पाणीसाठा आहे. म्हणजे २६.१० टक्के जिवंत पाणीसाठा आहे. गुरुवारी सकाळी आठ वाजेपर्यंत झालेल्या दहा मिलिमीटर पावसामुळे चार सेंटिमीटरने धरणातील पाणीपातळीत वाढ झाली आहे.

गतवर्षी १५ ऑक्टोबरला भरले होते धरण.....
गतवर्षी मांजरा प्रकल्पात सरासरी साडेसातशे ते आठशे मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. दरम्यान, १५ ऑक्टोबरला धरण भरले होते. त्यामुळे यंदाही परतीच्या पावसावर धरण भरेल अशी आशा आहे. १५ ऑक्टोबरपर्यंत एक-दोन मोठे पाऊस झाल्यास धरण भरू शकते, असा पूर्वानुभव आहे.

मांजरावरील दोन्ही अपर प्रकल्प रिकामेच.....
मांजरा धरणाच्या वर दोन छोटे प्रकल्प आहेत. ते अद्याप भरले नाहीत. त्यामुळे वरून पाण्याचा येवा नाही. प्रकल्प क्षेत्राच्या आजूबाजूला पडलेल्या पावसावरच यंदा मांजरा प्रकल्पात नव्याने २० दलघमी पाणी आले आहे.

Web Title: Water in Manjra Dam rose by four centimeters; Need more rain!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.