मांजरा प्रकल्पावरून पाणी उपसा पुन्हा बंद
By Admin | Published: May 12, 2017 11:38 PM2017-05-12T23:38:31+5:302017-05-12T23:41:18+5:30
लातूर : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा प्रकल्पातून २० तास पाणीपुरवठा बंद झाल्याने शहराचा पाणीपुरवठा तीन दिवस विस्कळीत होणार आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
लातूर : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा प्रकल्पातून २० तास पाणीपुरवठा बंद झाल्याने शहराचा पाणीपुरवठा तीन दिवस विस्कळीत होणार आहे़ गुरुवारी रात्री ८़३० वाजता वादळी वाऱ्यामुळे हरंगुळ येथील मनपाच्या जलशुद्धीकरण केंद्रातील सबस्टेशनमध्ये बिघाड झाल्याने पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे़ शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता बिघाड दुरुस्त करण्यात आला आहे़
लातूर शहरातील डालडा फॅक्टरी, वंदना पाण्याची टाकी, गांधी चौक पाण्याची टाकी येथून होणारा पाणीपुरवठा तीन दिवस विस्कळीत होणार आहे़
हरंगुळ येथील जलशुद्धीकरण केंद्रात विजेचा बिघाड झाल्याने तब्बल २० तास दुरुस्तीसाठी लागले आहे़
गुरुवारी रात्री ८़३० वाजता जलशुद्धीकरण केंद्रावरील यंत्रणा बंद पडली़ त्यामुळे मांजरा प्रकल्पातून पाणीउपसा बंद करण्यात आला होता़ शुक्रवारी सांयकाळी ५ वाजण्याच्या सुमारास बिघाड दुरुस्त झाल्यानंतर पाणीपुरवठा सुरु करण्यात आला आहे़ त्यामुळे गावभागात पाणी पुरवठ्याचे वेळापत्रक विस्कळीत झाल्याचे अभियंता सलाउद्दीन काझी यांनी सांगितले़