सिडको जलवाहिनीची गळती थांबेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 22:40 IST2019-07-09T22:40:10+5:302019-07-09T22:40:16+5:30
अंतर्गत जलवाहिनीच्या व्हॉल्व्हला गळती सुरु असल्याने पाणी वाहून जात आहे.

सिडको जलवाहिनीची गळती थांबेना
वाळूज महानगर : सिडको वाळूज महानगरातील एमआयजी व एलआयजी भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या अंतर्गत जलवाहिनीच्या व्हॉल्व्हला गळती सुरु असल्याने पाणी वाहून जात आहे.
जलकुंभ ते छत्रपती शिवाजी महाराज चौक मुख्य रस्त्यावरील एका शाळेमसोर एका वॉल्व्हला गळती लागली आहे. या गळतीमुळे कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याची ओरड नागरिकांमधून केली जात आहे. मात्र तरीही प्रशासनाकडून गळती दुरुस्तीसाठी ठोस पावले उचलले जात नाहीत.
प्रशासनाच्या या दुर्लक्षामुळे दररोज शेकडो लिटर पाण्याची नासाडी होत आहे. टंचाईच्या काळात पाण्याचा अपव्यय होत असल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.