शहरात पाण्याची असंख्य ठिकाणी गळती; मनपाच्या दुर्लक्षाने नागरिक पाण्यासाठी व्याकूळ

By मुजीब देवणीकर | Published: May 17, 2023 07:40 PM2023-05-17T19:40:45+5:302023-05-17T19:41:01+5:30

अनेक वसाहतींमध्ये पाणी आल्यावर रस्त्यावर अक्षरश: हजारो, लाखो लीटर पाणी वाहत असते.

Water leaks in numerous places in the city; Citizens worried about water due to the neglect of municipality | शहरात पाण्याची असंख्य ठिकाणी गळती; मनपाच्या दुर्लक्षाने नागरिक पाण्यासाठी व्याकूळ

शहरात पाण्याची असंख्य ठिकाणी गळती; मनपाच्या दुर्लक्षाने नागरिक पाण्यासाठी व्याकूळ

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : उन्हाचा पारा वाढताच शहरात पाण्याची मागणीही वाढली. महापालिकेकडे अतिरिक्त पाणी नाही. उपलब्ध पाणीच चार ते पाच दिवसाआड देण्यात येत आहे. एकीकडे पाणी नाही म्हणून ओरड करायची आणि दुसरीकडे पाण्याची गळती बंद करण्याची तसदी मनपा प्रशासन घ्यायला तयार नाही. मागील काही महिन्यांपासून रेल्वेस्टेशन प्रवेशद्वाराजवळ जलवाहिनीतून मोठ्या प्रमाणात पाणी वाया जाते. व्हॉल्व्हमधून अनेक ठिकाणी गळती सुरू आहे, तरी प्रशासन लक्ष द्यायला तयार नाही.

शहराला दररोज २०० ते २२० एमएलडी पाण्याची गरज आहे. जायकवाडीहून दररोज १२० ते १२५ एमएलडी पाणी शहरात आणले जाते. त्यानंतरही नागरिकांना आठवड्यातून एकदाच पाणी मिळते. त्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय. पाण्यासाठी सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. नागरिकांना दिलासा मिळावा असे कोणतेही ठोस पाऊल मनपाकडून उचलण्यात येत नाही. उलट नागरिकांसमक्ष पाण्याची नासाडी केली जाते. त्यामुळे नागरिकांमध्ये महापालिकेच्या कारभाराबद्दल चीड निर्माण होत आहे.

अनेक वसाहतींमध्ये पाणी आल्यावर रस्त्यावर अक्षरश: हजारो, लाखो लीटर पाणी वाहत असते. त्याचप्रमाणे किमान १०० पेक्षा अधिक व्हॉल्व्हमधून पाणी वाहत असते. मिलकॉर्नर, ज्युबली पार्क रस्त्यावर दररोज रात्री व्हॉल्व्हमधील पाणी वाया जात असते. या पाण्यावर गुळगुळीत डांबरी रस्ताही उखडत आहे. असाच काहीसा प्रकार रेल्वे स्टेशन येथे प्रवेशद्वाराजवळ पाहायला मिळाला. हे वाया जाणारे पाणी थांबवा अशी मागणी या भागातून ये-जा करणाऱ्या नागरिकांनी केली. दरम्यान, या प्रकाराबद्दल पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले की, जलवाहिनीचे लिकेज, व्हॉल्व्हमधून वाहणारे पाणी असेल, ही दुरुस्तीची प्रक्रिया बाराही महिने सुरू असते. अनेक व्हॉल्व्ह खूप जुने आहेत, दरराेज चालू बंद करताना त्यातून किंचित पाणी बाहेर येते.

Web Title: Water leaks in numerous places in the city; Citizens worried about water due to the neglect of municipality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.