जायकवाडीतून १२ तास पाण्याचा उपसा बंद

By Admin | Published: July 15, 2017 12:52 AM2017-07-15T00:52:16+5:302017-07-15T00:54:32+5:30

औरंगाबाद : वीज वितरण कंपनीने शुक्रवारी दुरुस्तीसाठी जायकवाडी येथील वीजपुरवठा सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत बंद ठेवला.

Water logging off from Jaiswadi for 12 hours | जायकवाडीतून १२ तास पाण्याचा उपसा बंद

जायकवाडीतून १२ तास पाण्याचा उपसा बंद

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : वीज वितरण कंपनीने शुक्रवारी दुरुस्तीसाठी जायकवाडी येथील वीजपुरवठा सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत बंद ठेवला. त्यामुळे महापालिकेला दोन्ही पाणीपुरवठा योजना बंद ठेवाव्या लागल्या. रात्री उशिरा वीजपुरवठा सुरळीत झाल्यावर पाणी आणण्याचे काम सुरू झाले. शहरात सकाळी ६ वाजेपासून पाणी येण्यास सुरुवात होईल. शनिवारी ज्या वसाहतींना पाणीपुरवठा करायचा होता त्यांना पाणी मिळण्याची शक्यता कमी आहे.
चार दिवसांपूर्वीच वीज वितरण कंपनीने मनपाला शुक्रवारी १२ तासांचा शटडाऊन घेण्यात येणार असल्याचे कळविले होते. नियोजित वेळेनुसार शुक्रवारी सकाळी ९ वाजता वीज कंपनीने जायकवाडी पंप हाऊस येथील वीजपुरवठा खंडित केला. दरम्यान, महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने मुख्य जलवाहिनीवरील दहा गळत्यांची रिपेअरिंग केली. रात्री नऊनंतर वीजपुरवठा सुरू झाल्यावर मनपाने एकानंतर एक पाण्याचे पंप सुरू केले. शहरात पाणी आणण्यासाठी ६ ते ८ तासांचा अवधी लागतो. सकाळी ६ वाजता शहरातील प्रमुख टाक्यांवर पाणी येण्यास सुरुवात होईल. दिवसभर मुख्य पाण्याच्या टाक्या भरून घेणे, त्यानंतर इतर लहान टाक्या भरून घेण्यात येतील. शुक्रवारी अनेक वसाहतींना निर्जळीचा सामना करावा लागला. या वसाहतींना आता शनिवारी पाणी देण्याचे नियोजन मनपाच्या पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात येत असल्याची माहिती कार्यकारी अभियंता सरताजसिंग चहल यांनी दिली.
पाण्याची जायकवाडीकडे झेप
पैठण : नाशिक जिल्ह्यात गेल्या २४ तासांपासून मुसळधार पाऊस पडत असून तेथील धरणात ५० टक्यांपेक्षा जास्त जलसाठा झाल्याने नांदूर मधमेश्वर वेअरमधून गोदावरीच्या पात्रात २२३०० क्युसेक्स क्षमतेने विसर्ग करण्यात येत आहे. गोदावरी दुथडी भरून वाहती झाली असून या पाण्याने जायकवाडीकडे आगेकूच केली आहे. शनिवारी दुपारनंतर हे पाणी जायकवाडीत येऊन धडकण्याची शक्यता धरण अभियंता अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली. पावसाचा दीड महिना लोटल्यानंतरही जायकवाडीत आवक नसल्याने मराठवाड्यात काळजीचे वातावरण पसरले होते.

Web Title: Water logging off from Jaiswadi for 12 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.