‘मधमेश्वर’चे पाणी ‘जायकवाडी’च्या दिशेने झेपावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 10:12 PM2018-11-19T22:12:05+5:302018-11-19T22:12:20+5:30

औरंगाबाद : निळवंडेतून जायकवाडीसाठी येणारे पाणी पुनदगावनंतर अखेर सोमवारी मधमेश्वर बंधाऱ्यातून जायकवाडी धरणाच्या दिशेने झेपावले. मधमेश्वर बंधाºयातून ४५९ क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात आला. विसर्ग अंत्यत कमी असल्याने पाण्याचा प्रवाहदेखील अतिशय संथ असल्याने सायंकाळपर्यंत पाणी जायकवाडीत पोहोचले नव्हते.

The water of 'Meshameshwar' flashed towards 'Jaikwadi' | ‘मधमेश्वर’चे पाणी ‘जायकवाडी’च्या दिशेने झेपावले

‘मधमेश्वर’चे पाणी ‘जायकवाडी’च्या दिशेने झेपावले

googlenewsNext

औरंगाबाद : निळवंडेतून जायकवाडीसाठी येणारे पाणी पुनदगावनंतर अखेर सोमवारी मधमेश्वर बंधाऱ्यातून जायकवाडी धरणाच्या दिशेने झेपावले. मधमेश्वर बंधाºयातून ४५९ क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात आला. विसर्ग अंत्यत कमी असल्याने पाण्याचा प्रवाहदेखील अतिशय संथ असल्याने सायंकाळपर्यंत पाणी जायकवाडीत पोहोचले नव्हते.


निळवंडेतून पाणी सोडल्यानंतर जवळपास १६ बंधारे पार करून सहाव्या दिवशी मधमेश्वर बंधाºयातून विसर्ग झाला. मधमेश्वरनंतर बंधारा नाही. मधमेश्वर ते जायकवाडी हे अंतर जवळपास १७ कि.मी.चे आहे. निळवंडेतून सहाव्या दिवशीही सोमवारी २ हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू होता, तर ओझर बंधाºयातून १४७६ क्युसेकने विसर्ग कायम होता. दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास निळवंडेचे पाणी मधमेश्वर बंधाºयात पोहोचले. याठिकाणी बंधाºयाचे सर्व दरवाजे उघडण्यात आले होते.

त्यामुळे येथून नाथसागराकडे पाणी रवाना झाले. दुपारपर्यंत या ठिकाणाहून ३२९ क्युसेकने विसर्ग सुरू होता. सायंकाळी सहा वाजता विसर्गात काही प्रमाणात वाढ झाली. हा विसर्ग ४५९ क्युसेकपर्यंत पोहोचला. मधमेश्वरपासून जायकवाडीचे अंतर कमी असूनही सायंकाळपर्यंत पाणी पोहोचलेले नव्हते. जायकवाडीत मंगळवार सकाळपासून पाणी वाढण्यास सुरुवात होईल, असे लाभक्षेत्र विकास प्राधिक रणाचे अधीक्षक अभियंता संजय भर्गोदेव यांनी सांगितले.


दोन हजारांवरून चारशेवर विसर्ग
निळवंडेतून सतत सहा दिवसांपासून २ हजार क्युसेकने विसर्ग सुरू आहे; परंतु मधमेश्वर बंधाºयातून ४५९ क्युसेकने विसर्ग होत आहे. त्यामुळे पाणी वळविल्याने आणि चोरल्याने ही स्थिती झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. नाथसागरात अतिशय संथगतीने आवक होणार असल्याने जायकवाडीत पाण्याची कितपत भर पडेल, याविषयी चिंता व्यक्त होत आहे.

Web Title: The water of 'Meshameshwar' flashed towards 'Jaikwadi'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.