नांदूरमधमेश्वरचे पाणी गंगापूर हद्दीत दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:05 AM2021-02-07T04:05:07+5:302021-02-07T04:05:07+5:30
नांदूरमधमेश्वर कालव्याद्वारे रब्बी हंगामाचे पहिले आवर्तन सोडण्यात आले. याचा फायदा पिण्याच्या पाण्यासह सिंचनासाठी होणार आहे. ४ फेब्रुवारीला सकाळी नांदूरमधमेश्वर ...
नांदूरमधमेश्वर कालव्याद्वारे रब्बी हंगामाचे पहिले आवर्तन सोडण्यात आले. याचा फायदा पिण्याच्या पाण्यासह सिंचनासाठी होणार आहे. ४ फेब्रुवारीला सकाळी नांदूरमधमेश्वर येथून सुरुवातीला २०० क्यूसेक विसर्गाने कालव्यात पाणी सोडण्यात आले. नंतर हा विसर्ग वाढविण्यात येऊन ८०० क्यूसेक करण्यात आला आहे. शनिवारी रात्री ८ वाजेपर्यंत गंगापूर तालुक्याच्या हद्दीत पाणी दाखल झाले, असे कार्यकारी अभियंता अनिल निंभोरे यांनी सांगितले.
नांदूरमधमेश्वर कालव्याच्या लाभक्षेत्रात वैजापूर तालुक्यातील ४९ गावे, गंगापूर तालुक्यातील ४६ व कोपरगाव तालुक्यातील गावे असून, गावांना सिंचनासाठी कालव्यातून पाणी मिळणार आहे. तिन्हीही तालुक्यातील २० हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांसाठी सिंचनाचा फायदा होणार आहे. वितरिका क्रमांक १ ते २६ द्वारे हे पाणी पायथा ते माथा पद्धतीने सोडण्यात येणार आहे. साधारणतः २४ दिवस हे आवर्तन सुरू राहणार असल्याने ४५ दशलक्ष घनमीटर पाणी मिळणार आहे.