वन्यप्राण्यांसाठी पाणवठ्यात सोडले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:04 AM2021-04-25T04:04:41+5:302021-04-25T04:04:41+5:30

केळगाव : सिल्लोड-सोयगाव वनपरिक्षेत्रांतर्गत असलेल्या केळगाव, धावडा, गोकुळवाडी जंगलामधील पाणवठ्यामध्ये पाणी आटले असून, वनविभागाने या ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा सुरू ...

Water released into the reservoir for wildlife | वन्यप्राण्यांसाठी पाणवठ्यात सोडले पाणी

वन्यप्राण्यांसाठी पाणवठ्यात सोडले पाणी

googlenewsNext

केळगाव : सिल्लोड-सोयगाव वनपरिक्षेत्रांतर्गत असलेल्या केळगाव, धावडा, गोकुळवाडी जंगलामधील पाणवठ्यामध्ये पाणी आटले असून, वनविभागाने या ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा सुरू केला आहे. त्यामुळे या जंगलातील प्राण्यांना पाण्याची चिंता मिटली आहे.

केळगाव, धावडा जंगलात बिबट्या, हरीण, निलगाय, माकडे, रानडुक्कर यासह अनेक प्राण्यांचा अधिवास आहे. उन्हाळ्यात जंगलातील पाणीसाठे आटली जात असल्यानेही वन्यप्राणी पाण्याच्या शोधात गावाकडे येतात. प्राण्यांची गावाकडे येणे थांबाबे. तसेच त्यांना जंगलातच पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी वनविभागाकडून पाणवठे तयार करण्यात आलेली आहेत. या पाणवठ्यात वनविभाग दरवर्षी या परिसरात टँकरच्या साहाय्याने पाणी सोडतात. सिल्लोड वनपरिक्षेत्रांतर्गत टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. यासाठी वनरक्षक परदेशी, दत्ता कोल्हे, संतोष वडोदे हे परिश्रम घेत आहेत.

फोटो : सिल्लोड व सोयगाव वनपरिक्षेत्रांतर्गत केळगाव, धावडा, गोकुळवाडी जंगलामध्ये पाणवठ्यात टँकरने पाणी टाकताना वनकर्मचारी.

240421\img-20210424-wa0201_2_1.jpg

केळगाव जंगलात असलेल्या पाणवठ्यात पाणी सोडताना वनकर्मचारी.

Web Title: Water released into the reservoir for wildlife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.