जलपुनर्भरणाकडे वाढला उदगीरच्या नागरिकांचा ओढा़़़
By Admin | Published: April 23, 2016 11:39 PM2016-04-23T23:39:03+5:302016-04-23T23:53:56+5:30
श्रीपाद सिमंतकर , उदगीर उदगीर शहरात मराठवाडा जनता विकास परिषद, जेष्ठ नागरिक संघ व लोकमत यांच्या संयुक्त विद्यमाने जलपुनर्भरण चळवळीस सुरुवात झाली़
श्रीपाद सिमंतकर , उदगीर
उदगीर शहरात मराठवाडा जनता विकास परिषद, जेष्ठ नागरिक संघ व लोकमत यांच्या संयुक्त विद्यमाने जलपुनर्भरण चळवळीस सुरुवात झाली़ चळवळीच्या शुभारंभास उदगीरकरांनी जोमाने प्रतिसाद देत या कार्यात सहभाग नोंदविला़ घरोघरी, खाजगी रुगणालये, शिक्षण संस्था व सार्वजनिक ठिकाणी जलपुनर्भरणास प्रारंभ झाला़ आतापर्यत सुमारे पन्नास ठिकाणी जलपुनर्भरण प्रक्रीया झाली़
जलपुनर्भरणाच्या उदासीनते बाबत लोकमतमधून वृत्त प्रकाशित होताच उदगीरकरांनी मरगळ झटकुन पाण्याच्या नियोजनास सुरुवात केली़ उदयगिरी नेत्र रुग्णालयात या कामाचा शुभारंभ झाल्यानंतर नागरिकांनी दुरध्वनीहून व प्रत्यक्ष कामास भेट देवून आपणही यात सहभागी होवून जलपुनर्भरण करणार असल्याचे सांगितले़
बोलाचा भात बोलाचीच कढी असे न राहता नागरिकांनी त्वरीत साहित्य आणुन जलपुनर्भरण प्रक्रीया सुरु केली़ गच्चीवरील पाणी एकत्रित करुन फिल्टरव्दारे थेट बोअर मध्ये सोडणे, मोठा खड्डा करुन पाणी सोडणे व मॅजिक पीट यंत्रणेतून सांडपाणी जिरविणे आदी प्रकारांतून नागरिकांनी पाणी अडविणे व पाणी जिरवणे चालु केले आहे़
उदयगिरी लॉयन्स नेत्र रुग्णालय, अविनाश हेरकर, शिवधाम सोसायटी (८ घरे), महेश कॉलनी (१६ घरे), एस़ आऱ कोनाळे गुरुजी, चंद्रकांत पाटील, शिवराज विजयनगरकर, विजयकुमार माळी, श्रीमती वाकुडे , रामलिंग पंचाक्षरी, सुर्यकांत जोशी, उदयगिरी पेट्रोल पंप, महेश धनश्री, शैलेश बिराजदार, भाजीभाकरे, सेवानिवृत्त नायबतहसीलदार कांबळे यांनी आतापर्यंत जलपुनर्भरण केली असल्याची माहिती संयोजकांनी दिली़
जलपुनर्भरण चळवळीमुळे सातत्याने काम चालु असून नागरिकांनी पुढाकार घेतला आहे़ जलपुर्नभरणाची यंत्रणा व्यवसाय म्हणून बसवून देत असलो तरी हे सत्कार्य केल्याचा मनस्वी आनंद होतो अशी प्रतिक्रिया शिवानंद सुर्यवंशी यांनी दिली़