सव्वा कोटी भरले तरीही पाणीबाणी कायम...
By Admin | Published: July 14, 2017 12:32 AM2017-07-14T00:32:58+5:302017-07-14T00:33:30+5:30
जालना : थकीत वीज बिलापोटी महावितरणने नगरपालिकेच्या पाणीपुरवठा योजनेचा तोडलेला वीजपुरवठा गुरुवारी पालिकेने सव्वाकोटी रुपये भरल्यानंतर जोडण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : थकीत वीज बिलापोटी महावितरणने नगरपालिकेच्या पाणीपुरवठा योजनेचा तोडलेला वीजपुरवठा गुरुवारी पालिकेने सव्वाकोटी रुपये भरल्यानंतर जोडण्यात आला. असे असले तरी जुना जालन्यातील पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी अद्याप आठवड्याचा कालावधी लागणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे जालनेकरांना ऐन पावसाळ्यात पाणीबाणीचा सामना करण्याची वेळ आली आहे,
जायकवाडी-जालना पाणीपुरवठा योजनेचा देखभाल दुरुस्तीचा व वीज बिलाचा खर्च भागविण्यासाठी पालिकेला प्रत्येक महिन्याला मोठी कसरत करावी लागत आहे. एक कोटी २१ लाखांचे वीज बिल थकल्यामुळे महावितरणने आठवडाभरापूर्वी जायकवाडी व अंबड जलशुद्धीकरण केंद्रावरील वीज पुरवठा तोडला. याचा थेट परिणाम शहरातील पाणीपुरवठ्यावर झाला. जुना जालन्यातील पाणीपुरवठा आठ दिवसांपासून बंद असून, नागरिकांना पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. पावसाळ्यातही काही भागांत टँकरने पाणी विकत घ्यावे लागत आहे.